जत : विकास हेच माझे मुख्य ध्येय आहे आणि या ध्येयाच्या दिशेने अविरत वाटचाल चालू,तालुक्यातील प्रत्येक नागरिकांना सोईसुविधा मिळाव्यात यासाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे,असे उद्गार आ.विक्रमसिंह सावंत यांनी काले.ते जत पुर्व भागातील विविध विकास कामांचे भूमिपुजन मँरेथान कार्यक्रमात बोलत होते.यावेळी तालुका कॉग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.
यावेळी मौजे दरीकोणूर येथील हनुमान मंदिरासमोर सभामंडप बांधणे कामाचे भूमिपूजन, एकूण मंजूर रक्कम ८.५० लक्ष.,व्हसपेठ गुड्डापर सोर्डी ते दरीकोणूर रस्ता सुधारणा करणे, रक्कम ३ कोटी रुपये कामाचे भूमिपूजन,मौजे लमानतांडा येथे ग्रामपंचायत कंपाऊंड आणि पेव्हिंग ब्लॉक बसविणे, या कामाचे लोकार्पण,
खंडनाळ येथे गेटेड सिमेंट बंधारा बनविणे १ कोटी ३२.लक्ष रकमेच्या कामाचे भूमिपूजन,संख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती करणे ५४.३४ लक्ष कामाचे भूमिपूजन,संख येथील जि.प. शाळेच्या इमारतीचे बांधकाम करणे रक्कम रु.३९ लक्ष कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
स्थानिक मान्यवरांच्या आणि ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या.या विकास कामांमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन समाधान वाटले,असे यावेळी आ.सावंत यांनी भावना व्यक्त केल्या.