अखेर आठव्या दिवशी धनगर समाज्याच्या आंदोलन स्थगित

0
खासदार पाटील,आमदार सावंत, प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत लेखी  आश्वासनाने आंदोलनाची सांगता
जत : जत तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्नाची अंमलबजावणी करावी तसेच महामेष योजनेच्या लाभार्थ्यांना निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा, धनगर समाजाच्या घरकुल योजनेचा निधी उपलब्ध करून द्यावा,आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत आणि धनगर आरक्षण प्रश्नावर आत्महत्या केलेल्या बिरूदेव खर्जे कुटुंबाला आर्थिक सहाय्य करावे या मागण्यासाठी सलग आठ दिवस अशोक गोरड यांचे उपोषण सुरू होते.उपोषणाला खासदार संजय पाटील,आमदार विक्रमसिंह सावंत, आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सरदार पाटील, मन्सूर खतीब,प्रकाश जमदाडे, विक्रम ढोणे,यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी,सरपंच यांनी पाठिंबा दिला होता.

 

 

प्रांताधिकारी यांच्या चर्चेतून तीन मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला तसेच आत्महत्या केलेल्या खर्जे कुटुंबाला मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदतीचा धनादेश देण्याची पूर्ण कार्यवाही झाली असून तांत्रिक अडचणीमुळे दोन दिवसात या कुटुंबाला धनादेश देण्यात येईल असा विश्वास खासदार संजय पाटील यांनी दिला तसेच लोकसभा आचारसंहिता पूर्वी धनगर समाजाला न्याय मिळेल यासाठी प्रयत्न केला जाईल.यासाठी लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून हा प्रश्न सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार पाटील यांनी सांगितले तर आमदार विक्रमसिंह सावंत यांनी अधिवेशन काळात या प्रश्नांची चर्चा सभागृहात करून धनगर समाज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे सांगत उपोषण मागे घेण्याची आमदार खासदार यांनी विनंती केली.

 

यावेळी युवा नेते विक्रम ढोणे यांनी गेल्या नऊ वर्षांपासून धनगर समाजाची आरक्षण प्रश्नावर दिशाभूल केली जात असून केंद्र सरकारचे प्रतिनिधी सत्ताधारी पक्षाचे खासदार संजय पाटील आणि विरोधी पक्षाचे प्रतिनिधी आमदार सावंत यांच्याकडे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे धनगर आरक्षणप्रश्नी शिफारस करण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा आणि लोकसभा आचारसंहितापुर्वी हा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले.

 

 

उपोषणकर्ते अशोक गोरड यांनी प्रशासन,आमदार खासदार विविध पक्षाचे पदाधिकारी,सरपंच यांच्यासह ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाठिंबा दिला त्यांचे आभार मानले आणि हे आंदोलन तात्पुरते स्थगित केले असून एस टी आरक्षणाचे सर्टिफिकेट मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील असे सांगत आमदार खासदार विविध पक्षाचे पदाधिकारी,सरपंच यांच्यासह प्रशासन आणि विविध दैनिकाचे प्रतिनिधी पत्रकार तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांचे आभार मानले.यावेळी सरदार पाटील, प्रभाकर जाधव, शंकर वगरे,प्रवीण गडदे,निलेश बामणे, अमित दुधाळ,योगेश व्हनमाने,अविनाश माने, वसंत सलगर,भूपेंद्र कांबळे,यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.