जत भाजपाच्या या‌ नेत्यांने सुचविलेल्या १ कोटीच्या कामांना मंजुरी

0
जत: भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी सुचविलेल्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली असून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.तम्मनगौडा रवीपाटील यांची जत विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी जत तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तालुक्यातील विविध गावातील ग्रामपंचायत इमारती, रस्ते, मंदिर यासाठी निधीची मागणी केली होती‌. त्यापैकी सहा कामांना ग्रामविकास विभागाने १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

 

 

अनुसूची-२५१५,१२३८ अंतर्गत जत तालुक्यातील मंजूर कामे पुढीलप्रमाणे आहेत. माडग्याळ येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे, दरीबडची येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे, उमराणी येथील बनसिध्देश्वर देवस्थान संरक्षण भिंत बांधणे, करजगी येथील लायव्या मंदिर समोरील खुल्या जागेत सभागृह बांधणे, आसंगी तुर्क येथील शालूबाई मंदिरासमोरील खुल्याजागेत सभामंडप बांधणे, काराजनगी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.