शिराळा : सय्यदवाडी (येळापुर ता. शिराळा) येथे ट्रॅक्टरच्या फण्यावर बसण्याच्या हौस एका शाळकरी मुलाचा जीव घेऊन गेली आहे.ट्रँक्टरच्या खाली सापडून झालेल्या जखमेतून अति रक्तस्त्राव झाल्याने अनुज दिलीप पाटील (वय 11) हा शाळकरी मुलगा ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली आहे.
घटनास्थळा वरुन मिळालेली माहिती अशी की, सय्यदवाडी येथील ज्ञानदेव उर्फ बाबा पाटील हे त्यांच्या ट्रॅक्टर क्रमांक (एम एच 27 एल 999) ने वाल्मीक बापू दिंडे यांच्या शेतात पाच फणाचा नांगरने नागरटी करत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या तिसरी इत्तेत शिकणारा अनुज पाटील शाळा सुटल्यानंतर तसाच शेतात काम सुरु असलेल्या ट्रॅक्टर कडे गेला. त्याला ट्रॅक्टरच्या मागील फणावर बसायच्या हौसेने तो सारखासारखा ट्रैक्टर मागून फिरत होता.बाबा पाटील यांनी त्यास अनेक वेळा घरी जाण्यास सांगितले होते.
मात्र थोड्यावेळाने ड्रायवरचे लक्ष चुकवून तो नागराच्या फणावर जाऊन बसला.त्याला तात्काळ कराड येथे उपचारासाठी नेहण्यात आले मात्र तत्पुर्वी त्याचा मृत्यू झाला होता.त्याच वेळी ट्रॅक्टरचा फणाचा जोरदार धक्का बसून अनिकेत खाली पडला.त्यांच्या जखमेतून जादा रक्तस्राव झाला.त्याला तात्काळ कराड येथे उपचारासाठी नेहण्यात आले मात्र तत्पुर्वी त्याचा मृत्यू झाला होता.त्याच्या पश्चात आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.