खोजानवाडी तलावात कृष्णामाई अवतरली | शेतकऱ्यांत उत्साह

0
14
जत : जत तालुक्यात गेल्या दिवसात राजकीय नेत्यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे तालुक्यातील शक्य ‌त्या गावात म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचविले जात आहेत.नुकतेच बिळूर कालव्यातून दक्षिण भागातील खोजानवाडी तलावात पाणी सोडण्यात येत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

 

जतेत विकास निधीमुळे कामे गतीने
जत : जत शहरात विकास निधी मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने रस्ते,गटारी,सार्वजनिक परिसर,ओढ्यावरील पुले,विस्तारित भागातील डांबरीकरणाचे रस्ते,स्वच्छता या बाबतची कामे शुरू आहेत.
वेध निवडणूकांचे,सोशल मिडियात चर्चांना उधान
जत : राज्यभरात सध्या लोकसभा,विधानसभेसह अन्य निवडणूकांच्या हालचाली चालू आहेत.त्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात नेते सक्रीय झाले असून म्हैसाळ पाणी हा या राजकारणातील कळीचा मुद्दा ठरत आहे.सातत्याने त्यावरच राजकीय नेत्यांचा भर असल्याने सोशल मिडियावर कार्यकर्त्यांचा जोरदार खल सुरू असतोय.
जत तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था 
जत – तालुक्यातील पुर्व भागातील अनेक रस्त्यांवर मोठ्ठाले खड्डे पडले आहे. बांधकाम विभागाने अद्यापही दुरुस्ती केली नाही. पावसाळ्यात या खड्डय़ांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची भीती आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्याला खड्डे पडले असून वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही.
लहान मुलांमध्ये टीव्ही आणि मोबाईलमुळे दृष्टीदोष
जत: लहान बाळं जेवत नाही, हट्ट करतं म्हणून त्याच्यासमोर मोबाईल ठेवला जातो. जवळजवळ सर्वच घरांमध्ये ही परिस्थीती पाहायला मिळते. पण आपल्या लहानग्यांना मोबाईल हाताळण्यास देणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. ही बातमी ऐकून तरी तुम्ही आपल्या चिमुरड्यांजवळ मोबाईल देताना दहा वेळा विचार कराल.महाराष्ट्रातील जवळपास सव्वा लाख लहान मुलांचे डोळे ‘आळशी’ बनलेत… या मुलांना ‘अम्ब्लोपिया’ नावाचा डोळ्यांचा आजार झालाय… मोबाईल, टीव्ही आणि टॅबच्या प्रकाशामुळं लहान मुलांमध्ये हा दृष्टीदोष वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय.
वातावरणातील बदलाने सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले
जत : शहरात दहा रुग्णांमागे सात रुग्ण सर्दी, खोकल्याचेच आढळून येत आहेत. दिवसभर ऊन आणि रात्री थंडी असे विषम हवामान सध्या आहे. वातावरणात झालेला हा बदल सर्दी-खोकल्याला निमंत्रण देणारा ठरला आहे. त्यामुळे नागरिक व लहान मुलांनी स्वत:ला सुरक्षित ठेवावे, असे आवाहन शहरातील तज्ज्ञांनी केले आहे. मोठ्यांपेक्षा लहान मुलांनाच जास्त सर्दी, खोकला सुरू असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनामुळे सर्दी-खोकला आला तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते.कोरोना नसला तरी पावसाळा व हिवाळा या दोन ऋतूंच्या बदलामध्ये वातावरणात मोठा बदल झालेला आहे. हा बदल स्वीकारण्याइतकी प्रतिकारशक्ती मुलांमध्ये नसते. त्यामुळे या बदलाचा सर्वाधिक त्रास मुलांना होतो, असे शहरातील तज्ज्ञांनी सांगितले.

हवेतील प्रदूषण, फटाक्यांमुळे झालेले प्रदूषण, वातावरणात अचानक झालेला बदल, दिवसभर ऊन आणि रात्री थंडी अशा वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला होताच नागरिकांनी तात्काळ उपचार करावेत. धूर, धूळ, गोड पदार्थामुळे सर्दीत वाढ होते. दूषित पाण्यामुळे काही ठिकाणी जुलाबाचेही रुग्ण आढळून येत आहेत.घाणीमुळे डासांचे प्रमाण वाढते, त्याचा परिणाम मलेरिया, चिकुनगुणिया, गोचीड अशा आजारांमध्ये होतो. ढगाळ हवामानामुळे अस्थमा, दम्याचेही रुग्ण वाढले आहेत. उष्ण पदार्थ खाणे, सकस आहार घेणे, मोड आलेली कडधान्ये खाणे, बेकरीचे पदार्थ, जंकफूड खाणे टाळणे, नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. वातावरणात बदल झाला तरी त्याचा परिणाम होणार नाही.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here