सराईत घरफोडी, दुचाकी चोरट्याला अटक; सात गुन्ह्याचा छडा

0
8

सांगली: सांगली शहर व जिल्ह्याच्या  विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या व घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याला सांगली शहर पोलिसांच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेतले. मोहंमद अब्दुलगनी शेख (वय २०, रा. अलअमीन शाळेजवळ, शामरावनगर, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून २ लाख ५५ हजार १८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्याच्याकडून सुमारे सात गुन्हे उघडकीस आले आहेत.संशयित शेख याने चोरीची कबुली दिली. यात चार दुचाकी, घरफोडी व उघड्यावरील चोरी केल्या आहेत.

 


सांगली शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तपास करत होते.त्यानुसार पथकाला माहिती मिळाली की, संशयित शेख हा शहरातील शामरावनगर येथील झुलेलाल मंदिराजवळ चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी जवळील दुचाकी शंभरफुटी रस्त्यावरून चोरल्याचे सांगितले.

शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, गुंडोपंत दोरकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here