दुचाकी चोरीप्रकरणी जत तालुक्यातील एकास अटक,सहा दुचाकी जप्त

0
9

सांगली : सांगली जवळ तानंग फाटा येथे चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. संतोष मारुती हाके (वय १९, रा. बागेवाडी, ता. जत) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून दोन लाख १० हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.जत तालुक्यातील चोरटा सापडल्याने खळबंळ उडाली आहे.

जिल्ह्यात वाढलेल्या दुचाकी चोरीच्या प्रकारांमुळे चोरट्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक गस्तीवर असताना, त्यांना माहिती मिळाली की, संशयित हाके हा तानंग फाटा येथील पुलाजवळ चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी थांबला आहे. त्यानुसार पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले.

यावेळी संशयित हाके याने पोलिसांना सांगितले की, त्याचा मित्र महंमद शेख (रा. सांगली) याने चोरी केलेल्या सहा दुचाकी विक्री करण्यासाठी त्याच्याकडे दिल्या आहेत. यातीलच एक दुचाकी विक्रीसाठी येथे थांबल्याचेही त्याने सांगितले. इतर दुचाकी त्याने त्याच्या घराजवळ ठेवलेल्या असल्याचेही सांगितले. पथकाने त्या सर्व दुचाकी जप्त करीत त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलीस कसून तपास करत आहे़त.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here