जत : रेल्वे पूल बांधकामासाठी मारुती मंदिरापासून रेल्वे लाईनला लागून शंभर फुटी डीपी रोडवरून पर्यायी वाहतूक वळवावी,अशी मागणी आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी केली आहे.
सांगली मिरज रस्त्यावरील मारुती मंदिरा जवळील रेल्वे पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आले आहे तो पाडून नवीन पूल बांधावा हा विषय शासनाच्या विचाराधीन आहे त्यासाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था करण्यासंदर्भात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे.
दोन शहरांना जोडणारा व सर्वाधिक वाहतूक असणारा हा रस्ता आहे.त्यामुळे केवळ दिशा दाखवून लोकांच्या भरवशावर सोडल्यास अडचण निर्माण होऊ शकते. रेल्वे पुलाची सद्य परिस्थिती पाहता तो फार काळ ठेवणे योग्य नाही अशी परिस्थिती आहे.त्यामुळे नियोजन योग्य व ताबडतोब करण्याची अत्यंत गरज आहे.राज्यातील बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे फुलाचे काम करत असताना कोणत्यातरी कारणाने दिरंगाईमुळे दोन-तीन वर्षे पूर्ण होण्यास लागतात.त्यामुळे कालावधी काही कारणाने ज्यादा लागल्यास सर्वसामान्य जनता व लहान मोठी दुचाकी चारचाकी व अवजड वाहतूक याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे कोणताही त्रास होऊ नये अशा पद्धतीने वाहतुकीची पर्याय व्यवस्था करावी.
विजयनगर चौक ते रेल्वे पुलाच्या उतर बाजू 100 फुटी डीपी रोड टाऊन प्लॅनिंग नकाशा मध्ये आहे.सदर डीपी रोड मारुती मंदिराकडून येणाऱ्या रोडला जोडला गेलेला आहे.तसा तो पुढे रोड क्रॉस करून एसटी वर्कशॉप समोर मिरजेच्या एमआयडीसीला ओलांडून पुढे गेलेला आहे.विजयनगर चौकातून आलेला रोड रेल्वे पुला खालून पुढे आल्यानंतर रेल्वे लाईनच्या उत्तर बाजू वरून रेल्वे लाईन प्यारलल असणारा शंभर फुटी डीपी रोड खडीकरण किंवा डांबरीकरण केल्यास मारुती मंदिराकडे जाणाऱ्या वाहतुकीची व्यवस्था होईल तसेच सांगली मिरज रस्त्यावरील रोड पुल पाडल्यानंतर चांगला पर्याय निर्माण होणार आहे.
तरी याबाबत नगर रचना विभागाकडून अधिकारी यांचे बरोबर कागदपत्र नकाशा पाहून चर्चा व्हावी व हा सुचवलेला पर्याय सर्वात योग्य व चांगला व कमी खर्चातील आहे.त्यामुळे याचा प्राधान्याने विचार व्हावा,अशी मागणीही आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष साबळे यांनी केली आहे.