मायक्रो फायनान्सचे कर्ज माफ करा,या संघटनेने दिले तहसीलदारांना निवेदन

0शेगांव, संकेत टाइम्स : मायक्रो फासनान्सचे कर्ज माफ करावे,यासह अन्य मागण्यासाठी जत तालुका पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे,मायक्रो फायनान्स कडील सर्व कर्ज माफ करून कोरोना काळात नागरिकांना मदतीचा हात द्यावा.

विधवा,परित्यक्ता व निराधार महिलांना दरमहा तीन हजार रुपये अपत्ती वेतन चालू करावे.


कोरोनामुळे अडचणीतील महिला,शेतमजुरांना नव्याने संसार उभारण्यासाठी राष्ट्रीय बँकांच्या कडून बिगर व्याज व बिगर जामीनदार एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज द्यावे.या मागण्या 15 दिवसात जर मंजूर नाही झाल्या तर पुरोगामी संघर्ष परिषदेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांचे नेतृत्वाखाली जत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.Rate Card
यावेळी पुरोगामी संघर्ष परिषदेचे जत तालुका अध्यक्ष दीपक खुडे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा रेखा कांबळे,संपर्कप्रमुख अंकुश खुडे,तालुका उपाध्यक्ष प्रमोद खुडे,अनिकेत कांबळे,अमोल खुडे,सर्जेराव साठे,विशाल गेजगे आदी मान्यवर उपस्थित होते.
जत : पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.