विक्रम फौंडेशनकडून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

0
जत : माजी मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त व डॉ. विश्वजित कदम साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून “विक्रम फौंडेशन जत” तर्फे भव्य नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले आहे.या नेत्र तपासणी आयोजित गावातील ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी होणार असून या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची नेत्रतज्ञाद्वारे निःशुल्क तपासणी व योग्य सल्ला-मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी जत मतदारसंघातील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आ.विक्रमसिंह सावंत यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांचा सत्कार
जत : जत तालुक्यातील पुरस्कारप्राप्त ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांचा तसेच पदोन्नती झालेल्या अधिकाऱ्यांच्या सत्कार आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते करण्यात आला.तालुक्यातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी येथील जनतेच्या हित डोळ्यासमोर काम करावे,शासकीय योजना प्रभावीपणे राबवाव्यात असे आवाहन यावेळी आ.सावंत यांनी केले.
Rate Card

सांगली जिल्हा परिषदेकडून नुकतेच जिल्हयातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचा सत्कार करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच अनेकांची पदोन्नती देखील झाली होती. याप्रसंगी त्यांचा सत्कार करत आ.सावंत यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. येत्या काळात त्यांनी अशीच यशाची शिखरे सर करावीत असे  सदिच्छाही दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.