सांगली जिल्ह्यात दोन दिवसात तेलाच्या ६०१ टँकर्सची वाहतूक,जिल्ह्यासाठी 25 टक्के पुरवठा 

0
सांगली : जिल्हा प्रशासनाने वेळीच उपाययोजना केल्याने सांगली जिल्ह्यामधील भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल कार्पोरेशन या तीनही कंपन्यांच्या ऑईल डेपो मधून गेले दोन दिवस तेलाची वाहतूक सुरळीतपणे चालू आहे. दिनांक 1 जानेवारी रोजी   प्रशासनाने मध्यस्थी केल्यामुळे दुपारनंतर तीनही कंपन्याच्या तेलाच्या एकूण 148 व दिनांक 2 जानेवारी रोजी तिन्ही कंपन्यांच्या तेलाच्या एकूण 453 टॅंकर्सची अशी दोन दिवसात तेलाच्या एकूण ६०१ टँकर्सची वाहतूक करण्यात आली. त्यापैकी जवळपास 25 टक्के तेलाचे टँकर्स हे सांगली जिल्हयासाठी पुरविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे. दि. ३ जानेवारी रोजीची तिन्ही कंपन्यांकडून वाढीव वेळेसह तेलाच्या टँकर्सची वाहतूक सुरू असून नजीकच्या पाच जिल्ह्यात सुरळीत पुरवठा सुरू आहे.

Rate Card
प्रसिध्दीपत्रकात म्हटले की, सांगली जिल्ह्यामध्ये हजारवाडी पलूस येथे HPCL कंपनीचा, चंदनवाडी मिरज येथे BPCL व IOCI या कंपनीचा तेल डेपो आहे. सदर डेपो मधून सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये तेलाची वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर दिनांक 1 व 2 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व वाहतूकदार संघटना यांच्या संयुक्त बैठकीत सर्व तेल वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. तद्नतर  दिनांक 1 जानेवारी रोजी IOCL या कंपनीचे 56, BPCL या कंपनीचे 26 HPCL कंपनीचे 66 असे एकूण 148 दिनांक 2 जानेवारी रोजी IOCL या कंपनीचे 180, BPCL या कंपनीचे 115 व HPCL कंपनीचे 158 अशा तेलाच्या एकूण 453 टँकर्सची वाहतूक करण्यात आली असून सद्यस्थितीत तेलाची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.