जत : संपूर्ण देशवासीयांना २२ जानेवारीची उत्कंठा लागली असून, या दिवशी प्रभू श्री रामचंद्र हे आयोध्येच्या मंदिरात विराजमान होणार आहेत. देशभर दिवाळीसारखा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.या पार्श्र्वभूमीवर श्रीराम मंदिर अक्षता कलश यात्रेचे जत तालुक्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.जत शहरातील मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
भगवान विष्णूने श्रीरामाचा जन्म घेवून रावणाचा नाश करून पृथ्वीवर रामराज्य यावं म्हणून प्रार्थना केली. श्री प्रभू रामचंद्र हे आदर्श पुत्र ,आदर्श भाऊ तसेच आज ही भाऊ कसा असावं तर राम लक्ष्मण सारखे असावे हे सांगितल जात.त्यांनी कायम आई वडिलांचा आदेश मानून काम केलं इतकचं नाही तर रावणाचा मृत्यू झालेनंतर त्यांचे बंधू बिभीषण यांनी अंत्यसंस्कार करणेस नकार दिला त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी सांगितल की तुम्ही अग्निसंस्कार करणार नसेल तर मी करतो रामचंद्रांनी त्यांना सांगतात की मरणाबरोबर वैर संपते.
तुम्ही जर करणार नसेल तर मी अग्निसंस्कार करेन.आज ही ग्रामीण भागात दोन मित्र ,नातेवाईक भेटले की राम राम म्हणतात इतका प्रभू राम आपल्यात आहे.400 वर्षानंतर अयोध्या येथे 24 जानेवारीला राम लल्ला मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे. हा आम्हा हिंदूचा अभिमान आहे.यासाठी जत शहरातून शोभा यात्रा व कलाशाच पूजन करण्यात आले.यावेळी माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे,श्रीपाद अष्टेकर,भाजपा अध्यक्ष प्रमोद सावंत,युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संग्राम जगताप,मोहन उर्फ भैय्या कुलकर्णी,भाजपा माजी तालुका अध्यक्ष श्री चंद्रकांत गुडोडगी, प्रभाकर जाधव,विजयराजे चव्हाण व अनेक शिवप्रेमी व श्री प्रभू रामचंद्रांचे भक्त उपस्थित होते.शोभा यात्रा मारुती मंदिर ,मार्केट यार्ड , महाराणा प्रताप चौक बनाळी चौक,लोखंडी पुल ,संभाजी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राम मंदिर येऊन कलाशाच पूजन केलं यावेळी प्रकाशराव जमदाडे फाउंडेशनचे माध्यमातून प्रसादाचे वाटप केले.