
प्रसिध्दीपत्रकात म्हटले की, सांगली जिल्ह्यामध्ये हजारवाडी पलूस येथे HPCL कंपनीचा, चंदनवाडी मिरज येथे BPCL व IOCI या कंपनीचा तेल डेपो आहे. सदर डेपो मधून सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांमध्ये तेलाची वाहतूक केली जाते. या पार्श्वभूमीवर दिनांक 1 व 2 जानेवारी रोजी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व वाहतूकदार संघटना यांच्या संयुक्त बैठकीत सर्व तेल वाहतूक व्यवस्था सुरळीत होण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. तद्नतर दिनांक 1 जानेवारी रोजी IOCL या कंपनीचे 56, BPCL या कंपनीचे 26 HPCL कंपनीचे 66 असे एकूण 148 दिनांक 2 जानेवारी रोजी IOCL या कंपनीचे 180, BPCL या कंपनीचे 115 व HPCL कंपनीचे 158 अशा तेलाच्या एकूण 453 टँकर्सची वाहतूक करण्यात आली असून सद्यस्थितीत तेलाची वाहतूक, पुरवठा व वितरण सुरळीत सुरू आहे. जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रसिध्दीपत्रकात करण्यात आले आहे.