प्रभू श्रीराम नावातच भारतीय संस्कृतीचे होते दर्शन | हभप तुकाराम बाबा महाराज | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले कौतुक

0
12
जत : संपूर्ण जगात मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाणारे श्री रामाचे नाव मुखात येताच आई, वडिलांची सेवा करणारा, भावाच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा, पती-पत्नीचे नाते सांगणारा व प्रजेबरोबर कसे वागावे, न्याय कसा द्यावा याची शिकवण देणाऱ्या प्रभू श्री रामांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. प्रभू श्री राम नावातच भारतीय संस्कृतीचे  दर्शन होते या शब्दात चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी श्री रामाचे वर्णन करत श्री रामलल्लाचे मूर्ती प्राण प्रतिष्ठापनेचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही बाबांनी कौतुक केले.
आयोध्येमध्ये श्री रामाची मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सुरू असताना जत तालुक्यातील सोन्याळ येथेही विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यावेळी कायाण्णा महाराज, सोन्याळ, हणमंतगौड बिरादार,  सोन्याळचे सरपंच बसवराज तेली, उपसरपंच पतण्णा गारळे, माजी सरपंच काडसिद्ध  कारजनगी, विजयकुमार बगली,  ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे, संगाप्पा मुचंडी, माजी उपसरपंच चिदानंद तेली, कलाप्पा शिंगे, फकिरफ कारजनगी, सुरेश माडग्याळ, चनाप्पा निंगुर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
आयोध्येत श्री रामाची प्राणप्रतिष्ठापनेचे औचित्य साधत सोन्याळ गावात भक्तिमय वातावरणात श्री रामाचा गजर करत पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर बोलताना हभप तुकाराम बाबा महाराज यांनी भाविकांना, ग्रामस्थाना मार्गदर्शन केले. हभप तुकाराम बाबा महाराज यांनी या सोहळ्यानिमित्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष कौतुक करत ५०० वर्षानंतर आजचा हा दिन उगवला असल्याचे सांगितले.  श्री रामाचे मंदिर पूर्ण नाही असे सांगितले जाते पण ते खोटे आहे. आधी पाया, मग कळस यातच सारे आले. धार्मिक कार्यात राजकारण आणू नये असे आवाहनही यावेळी बाबांनी केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here