महात्मा बसवेश्वर सांस्कृतिक नायक | जतच्या खोजानवाडीत आंनदोत्सव

0
17

जत : कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने फर्स्ट पार्लमेंट निर्माता महात्मा बसवेश्वरांना कर्नाटक राज्य सांस्कृतिक नायक म्हणून घोषित केल्यामुळे जत तालुक्यातील खोजनवाडीत आंनदोत्सव साजरा ‌करण्यात आला.देशाच्या इतिहासात 12 व्या शतक अतिशय महत्त्वपूर्ण आहे.अज्ञान,अंधश्रद्धा,जातीवादात बुडालेल्या समाजाला बाहेर काढण्याची महात्मा बसवेश्वराबरोबर 770 शरण -शरणी अनुभव मंडपात एकत्र आले होते. तेच जगात पहिली पार्लमेंट म्हणजे पहिले संसद,अनुभव मंडप स्थापन केले आहे.

 

लिंगायत धर्म संस्थापक बसवेश्वरांचा भाव चित्र पूजन करून जय बसवेशा -भारत देशा, एक लिंगायत -कोटी लिंगायत,कट्टुवेवू नावू कट्टुवेवु-कल्याण राज्य कट्टुवेवू  असे जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.गावात जिलेबी वाटप करून, फटाक्याच्या आतशबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमात राष्ट्रीय बसव दलाचे पदाधिकारी,ग्रामपंचायत, सर्व सेवा सहकारी सोसायटी,तरुण मंडळाचे कार्यकर्ते व बसवभक्त, लिंगायतधर्मीय,बसवाभिमानी सहभागी झाले होते.लक्ष्मीबाई.काराजनगी, शिदराया काराजनगी,रावसाहेब काराजनगी, संगमेश्वर. हिप्परगी,महादेव.संती, काशिनाथ मोठे, एम.जी.काराजनगीसर, कनाळ सर, सदाशिव बिद्री,रुद्रप्पा मांग, दर्याप्पा. तेली,भैरू बिळूर,रामगोंडा कनमडी, संजू चौगुले, विलास चडी,रावसू बेळ्ळगी, धर्मांण्णा संती,बसवराज.भडकुंद्री, विठ्ठल शिवनूर, सुभाष तेरदाळ,विनोद खोतसर,महाजन उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here