आंवढीत हुमणी किड कार्यशाळा संपन्न

0आंवढी,संकेत टाइम्स : आंवढी ता.जत येथील अंकुश तात्यासो शिंदे यांच्या मळ्यात हुमणी किड नियंत्रण बीज उगळा क्षमता तपासणी व बीज प्रक्रिया मोहिम राबविण्यात आली.ऊसाचे क्षेत्र वाढ होतानाच त्यांचे उत्पादन वाढीसाठी प्रकाश सापळ्याचा वापर करून कमी खर्चात हुमणी कीडीचे नियंत्रण कसे करता येईल याचे प्रात्याक्षिक कृषी सहाय्यक एस.एम.नाटेकर यांनी करून दाखविले.

त्याचबरोबर खरीप हंगामात कृषी विभागाची महत्वकांक्षी योजना ठरणारी बीज प्रक्रिया मोहिमे अतर्गंत मका पिकांसाठी गाऊचो (इमिडाक्लोरोप्रीड) या रासायनिक कीटक नाशकांचा बिड‌ प्रक्रिया साठी कसा वापर करण्यात येतो,यांचेही प्रात्याक्षित दाखविण्यात आले.Rate Card1 किलो बियाणास 3 मिली द्रावण पाण्यात वापरून बीज प्रक्रिया सर्व शेतकऱ्यांनी करावी,असे आवाहन करण्यात आले.बीज उगवण कशी करायची हे दाखवून देण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बीज उगवण क्षमता व तपासणी मोहिमेत प्रात्याक्षिक दाखविताना कृषी अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.