जत विधानसभा जागा रिपाईला सोडावी |- विकास साबळे

0
जत : जत विधानसभेची उमेदवारी महायुतीतून रिपाईला द्यावी,रिपाईचे जेष्ठ नेते संजय कांबळे हे आमच्या सक्षम उमेदवार आहे,अशी माहिती रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी दिली आहे.साबळे पुढे म्हणाले,288 जत विधानसभा मतदारसंघ कायमस्वरूपी दुष्काळी असून आज पर्यंत म्हैशाळच्या पाण्यावर प्रस्थापित पक्षाच्या नेत्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा दाखवून स्वतःची पोळी भाजून घेतली आहे.गेली कित्येक वर्ष झाले पाण्याची आवश्यक असणारा शेतकरी या पुढाऱ्याच्या आश्वासनाला बळी पडून पाण्याकडे डोळे लावून बसला असून त्या पाण्याच्या आशेवरती दर पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अशा आश्वासन देणाऱ्या उमेदवारांना मतदान देऊन बळी पडत आहे.परंतु निवडणूक संपल्यानंतर हे प्रस्थापित पक्षाचे पुढारी कोणत्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही परंतु जतचे माजी आदर्श सरपंच संजय कांबळे यांचे नेतृत्वाखाली जतच्या पाणी प्रश्न संदर्भात व विविध विकास कामासंदर्भात वेळोवेळी मोर्चे आंदोलने उपोषणे रस्ता रोको करून शासनाला जागा देण्याचे काम करण्यात आले. उपविभागीय अधिकारी कार्यालय जतला करण्यासंदर्भात मोठा वाटा आहे संख व जत येथे केंद्रीय राज्यमंत्री मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळावा आयोजित करून गोरगरीब वंचित शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला आहे.

 

साबळे म्हणाले,केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या फंडातून जत येथील विविध कामासंदर्भात कोट्यावधीचा निधी मंजूर करून आणला असून त्याचे सरपंच म्हणून काम करत असताना शहर व उपनगरामध्ये नळ पाणीपुरवठा गटारी स्वच्छता दिवाबत्ती यांची सोय करून एक आदर्शवत काम केले असून या कामाची वेगवेगळ्या माध्यमांनी व संस्थेने दखल घेऊन आदर्श सरपंच व समाज भूषण म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.एक उच्चशिक्षित हुशार अभ्यासू व धाडसी नेतृत्व म्हणून संजय कांबळे यांच्याकडे तालुक्यातील जनता पाहत आहे.त्यांच्या कामाचा उरक व धाडसी नेतृत्व पाहून इतर पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात मोठ्या प्रमाणात प्रवेश करीत आहेत.आमच्या पक्षाचे काम तालुक्यातील तळागाळापर्यंत गावातील लोकांच्या पर्यंत पोहोचलेले असल्यामुळे व त्याच त्याच प्रस्थापित लोकांना जनता कंटाळली असल्यामुळे एक नवीन चेहरा आणि धडाडीचा धाडसी नेता म्हणून संजय कांबळे यांच्याकडे तालुक्यातील जनता भावी नेतृत्व पाहत असल्यामुळे व कार्यकर्त्यांच्या तालुकावर असलेल्या संपर्कामुळे संजय कांबळे हे विधानसभा निवडणूक जिंकू शकतात अशी परिस्थिती आहे.त्यामुळे भाजप व आमची राष्ट्रीय पातळीवर महायुती आहे या माध्यमातून जत विधानसभेची जागा रिपाईला सोडावी अशी आमची मागणी आहे.

 

Rate Card
साबळे म्हणाले,यापूर्वी लोकसभा विधानसभा, पंचायत समिती,जिल्हा परिषद,बाजार समिती,नगरपरिषद,सोसायटी या सर्व निवडणुकीमध्ये मित्रपक्ष म्हणून भाजपच्या बरोबरीने आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी हिरारीने भाग घेतला असून त्या बदल्यात मित्र पक्ष म्हणून भाजपच्या कडून शासकीय वेगवेगळी महामंडळे व कमिट्या इत्यादी वरती रिपाईला कुठेही स्थान दिले नाही.मानाचे स्थान दिलेले नाही आमचा वापर फक्त आणि फक्त मतापुरता आणि निवडणुकीपुरता करून घेतलेला आहे.त्यामुळे येणारी 2024 विधानसभा ही रिपाईला महायुतीतून सोडावी अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे  निवडणूक लढवणार आहोत,असे जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे म्हणाले.

 

यावेळी तालुकाध्यक्ष संजय कांबळे पाटील,विधानसभा क्षेत्राध्यक्ष महादेव हुचगोंड, कार्याध्यक्ष विनोद कांबळे युवक तालुका अध्यक्ष सुभाष कांबळे,चर्मकार आघाडी तालुकाध्यक्ष गणेश साळवे, महावीर मडीमणी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.