लोकप्रतिनिधीच जर कायद्यांचे उल्लंघन करीत असेल तर पोलिस विभागने काय करावे?

0

 
कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि कल्याण पूर्वचे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये व्दारली येथील एका जमिनीच्या मुद्यावरून दिनांक २ फेब्रुवारी शुक्रवारला पोलिस ठाण्यातच झालेला वाद विकोपाला गेला.या वादात आमदार गणपत गायकवाड यांनी थेट हिललाइन पोलिस ठाण्यामधील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला.यात शिंदे समर्थक महेश गायकवाड आणि राहुल पाटील याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले जाते.यावरून आता प्रश्न उद्भवतो की आमजनता किंवा पोलिस विभाग यांनी कोणावर विश्वास ठेवावा.पोलिस विभाग आमजनता, आमदार-खासदार(लोकप्रतिनिधी) यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चोख भुमिका बजावतात.आमजनतेमध्ये वाद नेहमीच होतात पोलिस विभाग त्या-त्या पध्दतीने ते हाताळीत असतात.परंतु आमदार (लोकप्रतिनिधी) जर पोलिस ठाण्यात सर्वांच्या समोर अंधाधुंद गोळीबार  करतो.हा लोकप्रतिनिधी (आमदार) या पदाला कलंक नाही का? आमदार हा निवडणूक आल्यांतर कोणत्याही एका पक्षाचा नसतो तो सर्वांचे प्रतिनिधित्व करीत असतो.

 

त्यामुळे पोलिस विभाग त्याचा मानसन्मान करतो.परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी दबंगगिरी व गुंडगिरी करून थेट पोलिस ठाण्यात अंधाधुंद गोळीबार करतो. याला माफियाराज नाही तर काय म्हणावे? आपण नेहमी गुंडाराजच्या नावावर उत्तरप्रदेश व बिहारला दोष देत असतो.परंतु आज साक्षात महाराष्ट्रात गुंडाराज आल्याचे दिसून येते.आज उत्तरप्रदेश व बिहार सुधारल्या सारखे वाटते. परंतु गणपत गायकवाड सारखे आमदार (लोकप्रतिनिधी) महाराष्ट्राला गुंडाराजच्या खाईत लोटत असल्याचे दिसून येते. आमदार गणपत गायकवाड व महेश गायकवाड यांचा मुख्य वाद हा प्रॉपरटीचा(संपत्तीचा) असल्याचे समजते.देशात किंवा राज्यात संपत्तीवरूनच वाद निर्माण होतो हे जगजाहीर आहे व हा वाद विकोपाला गेला की यातून माफियाराज किंवा गुंडाराज निर्माण होतो. ठाणेतील या प्रकरणावरून असे लक्षात येते की राज्यात माफियाराजचे पाऊले रूजत आहे की काय असे वाटत आहे.

 

त्यामुळे अशी शंका निर्माण होते की अशा पध्दतीची संपत्तीची हेराफेरी करून  अनेक लोकप्रतिनिधी प्रॉपरटी जमा करीत असावेत तेव्हा आज आपण पहातो की राज्यातील ८० टक्के आमदार-खासदार(लोकप्रतिनिधी) वाममार्गाने पैसा कमवुन व लोकांचा विश्वासघात करून करोडपती झाल्याचे दिसून येते.तेव्हाच त्यांच्या जवळ आलेशान बंगला,गाडी-घोडा, फार्म हाऊस,चल-अचल संपत्ती दिसून येते.आज आपण पहातो की देशासह राज्यातील शेतकरी, कामगार, कर्मचारी, व्यापारी, उद्योगपती व सर्वसामान्यांपेक्षा कमी वेळात व कमी दिवसांत सर्वात जास्त श्रीमंत असलेले फक्त मुठभर राजकीय पुढारी दिसून येतात.

 

Rate Card

याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय पुढाऱ्यांनी वाममार्गाने कमविलेला पैसा आणि त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यातील हिललाइन पोलिस ठाण्यामधील वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या दालनात आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर केलेला अंधाधुंद गोळीबारावरून लक्षात येते.मुख्य म्हणजे अशा पध्दतीच्या घृणास्पद आणि चिंताजनक घटना राज्याला काळीमा फासणाऱ्या आहेत.कारण अशा घटनांमुळे राज्याची किंवा पोलिस विभागाची बदनामी होत असते.त्यामुळे सरकारने व मुख्यत्वे करून गृहविभागाने अशा घटनांवर करडी नजर ठेऊन कठोर कारवाई करायला पाहिजे व आमदार (लोकप्रतिनिधी) किंवा कोणताही राजकीय पुढारी असो त्याला राजकीय क्षेत्रातुन नेहमीसाठीच हद्दपार करून त्यावर कडक कारवाई व्हायला हवी.कारण देशात महाराष्ट्र शांतीचे प्रतीक मानल्या जाते.त्यामुळे अशा घटना महाराष्ट्र राज्याला काळीमा फासणाऱ्या व चिंताजनक असल्याचे मी समजतो.याकरीता कोणताही गुन्हा असो त्याला माफी नकोच.

 

रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी, नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.