ई.व्हि.एम.नको,मतपत्रिकेद्वारेचं निवडणूका घ्या ! येथे‌ झाले आंदोलन

0
जत : जत येथे देशातील सर्व निवडणुका ई.व्हि.एम.ऐवजी मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यात याव्यात,या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.सध्या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकीची बिगुल वाजत आहेत.कॉग्रेसह समविचारी पक्षाचे महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.तालुका प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले.
देशात सरकार विरोधी लाट असताना,देशातील सर्व सर्व्हे मध्ये सत्ताधारी पक्ष पिछाडीवर असताना सत्ताधारी पक्षामार्फत मोठ मोठे दावे केले जात आहे.
मध्यंतरी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही जनतेचा कौल संपूर्णत विरोधात असताना जनतेच्या मनाच्या विरोधात निकाल लागलेला असल्याने जनतेच्या मनामध्ये ई.व्ही.एम.बद्दल संभ्रम अवस्था निर्माण झाली असून जनतेच्या मनामध्ये ई.व्ही.एम.बद्दल कोणत्याही प्रकारचा विश्वास राहिलेला नाही.त्यामुळे देशातील जनतेचा ई.व्ही.एम मशीन बद्दल असंतोष वाढत असून जनतेतून पूर्वी प्रमाणे मतपत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबविणेची मागणी जनता करीत आहे.देशातील जनतेच्या मागणीस अनुसरून लोकशाही मार्गाने योग्य पद्धतीने,सर्वमान्य मतदान प्रक्रीयेद्वारे मतदान होणे गरजेचे आहे.त्यामुळे देशातील सर्व निवडणुका पूर्वीप्रमाणे ई.व्ही.एम.ऐवजी मत पत्रिकेद्वारे मतदान प्रक्रिया राबविणेची मागणी निवडणुक आयोगास कळवून त्याप्रमाणे मतपत्रिकेद्वारे २०२४ ची लोकसभा  निवडणूक आणि इथून पुढील सर्व निवडणुका घेणेत याव्यात,अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जत यांना देण्यात आले.
यावेळी या आंदोलनात महिलांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदविला.या आंदोलनास सौ.वर्षाताई सावंत,नगराध्यक्षा सौ.शुभांगी ताई बन्नेनवर,विनोदिनी सावंत,मनीषा साबळे,सौ.सविता राजेशिर्के,अशोक बन्नेनवर,नगरसेवक नामदेव काळे, तुकाराम माळी,महादेव कोळी,आकाश बनसोडे,दिनेश जाधव,सुमित जगधने ,शोहेब नायकवडी,पिंटू व्हनमाने,राजू कारजोळ आदी मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.