आंदोलनाचा दणका | ..अखेर म्हैसाळचे पाणी शेड्याळमध्ये पोहचले

0
वळसंग : गेल्या दोन महिन्यापासून म्हैशाळ योजनेच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतचा लढा चालू होता.मागील आठवड्यात खासदार संजयकाका पाटील म्हैसाळ व योजनेचे सचिन पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आली होती,त्यांनी त्यावेळी आश्वासन देण्यात आले होती. अखेर या आश्वासनाची पूर्तता झाली. शेड्याळ तलावात म्हैशाळ योजनेचे पाणी पोहोचलेआहे.ग्रामस्थांनी या पाण्याचे पुजन केले.
शेडयाळ,वळसंग,पाच्छापुर,कोळगेरी,काराजनगी या गावातील ग्रामस्थाच्या वतीने मागील महिन्यात वळसंग येथे रास्ता रोको करण्यात आला होता.
याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली.शेड्याळ ग्रामपंचायतीच्या वतीने म्हैशाळ योजनेचे पाण्यासाठी पैसे हि भरले होते.पैसे भरूनही पाणी देत नाही असा प्रशासनावर ग्रामस्थाचा आरोप होता.अनेक वेळा निवेदन पाठपुरावा आंदोलन केल्यानंतर अखेर म्हैशाळ योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आले.पाण्याच पुजन गावातील 21 सुवासिनीच्या हस्ते पाणी पुजन केले. राष्ट्रवादीचे नेते सुनिल पवार व शिवसेना युवा नेते सरपंच भगवानदास केंगार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला.
यावेळी पाणी पूजननाला सरपंच रमेश माळी,कोळगेरी सरपंच हेळवी,उपसरपंच उषाताई जाधव,माजी सरपंच अशोक जाधव,माजी उपसरपंच कार्याप्पा गुगवाड,ग्रामपंचायत सदस्य विद्याधर जाधव,तायवा थोरात,तमाणा गुगवाड,म्हाळापा हावगोडीं,ग्रामसेवक सुदर्शन जाधव,ग्रामपंचायत कर्मचारी प्रविण जावीर,अशोक तेली,प्रगतशील शेतकरी रकमाजी केंगार,गिरीश जाधव,भाऊसो जाधव,संजय किरगत,संतोष नरुटे,पुजारी नागेश हावगोडीं यांच्यासह गावातील नागरिक शेतकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.