जत : जत तालुक्याच्या पूर्व भागासाठी वंचित असलेल्या ६५ गावच्या विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते १९ फेब्रुवारी रोजी भूमिपूजन होणार आहे. जत तालुक्यासाठी हा ऐतिहासिक व सूवर्णक्षण आहे, अशी माहिती भाजपचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
रविपाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १९ रोजी सातारा येथे येणार आहे. त्याठिकाणी व्हर्च्युअल पध्दतीने भूमिपूजन करण्यात येणार आहे.
विस्तारित म्हैसाळ योजना हे जत पूर्व भागाचे स्वप्न आहे. त्यासाठी मोठा संघर्ष झाला आहे. कर्नाटकात जाण्याचा ईशाराही देण्यात आला होता सुमारे दोन हजार कोटी रुपयांची ही योजना असून प्रधानमंत्री सिंचाई योजनेतून मंजूरी देण्यात आली आहे. जत तालुक्यासाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण असून आमच्यासाठी सुवर्णक्षण आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारित म्हैसाळ योजनेची २०१९ ला घोषणा केली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही योजना रखडली.आता देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारित योजनेचे उत्तरदायित्व घेतले. रविपाटील असेही रवीपाटील म्हणाले.
योजनेची सविस्तर माहिती
जत तालुक्यातील एकूण १२५ पैकी मूळ म्हैसाळ योजनेवरील ७७ गांवे वगळता उर्वरीत ४८ गांवे सद्यस्थितीत सिंचनापासून पूर्णपणे वंचित आहेत.शासनास दर वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चारा छावण्यांसाठी कोठ्यावधीचा निधी खर्च करावा लागतो, अशी परीस्थिती जवळ जवळ दर वर्षी निर्माण होत असलेने येथील जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली आहे. या गावांना पाणी देणेबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासून मागणी प्रलंबित आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी अतिरीक्त ६ टीएमसी इतक्या पाणी वापरास महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. संकिर्ण २०१९/प्र.क.१३६/१९/ज.सं. अ दि. ११/०८/२०२१ अन्वये मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण पाणी वापर ३२.७८ अघफू इतका असून, यापैकी कोयना धरणातून १९.०७ म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजना, ता. जत, जि. सांगली.
प्रकल्पाची व्याप्ती :
जत तालुक्यातील एकूण १२५ पैकी मूळ म्हैसाळ योजनेवरील ७७ गांवे वगळता उर्वरीत ४८ गांवे सद्यस्थितीत सिंचनापासून पूर्णपणे वंचित आहेत. शासनास दर वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी तसेच चारा छावण्यांसाठी कोठ्यावधीचा निधी खर्च करावा लागतो, अशी परीस्थिती जवळ जवळ दर वर्षी निर्माण होत असलेने येथील जनता दुष्काळामुळे त्रस्त झालेली आहे. या गावांना पाणी देणेबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची बऱ्याच वर्षापासून मागणी प्रलंबित आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी अतिरीक्त ६ अ.घ.फू. इतक्या पाणी वापरास महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्र. संकिर्ण २०१९/प्र.क.१३६/१९/ज.सं. अ दि. ११/०८/२०२१ अन्वये मान्यता मिळालेली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण पाणी वापर ३२.७८ अघफू इतका असून, यापैकी कोयना धरणातून १९.०७ अ.घ.फू. व कृष्णा नदीतून ७.७१ अ.घ.फू. तसेच वारणा धरणातुन ६ अघफू असा एकूण ३२.७८ टीएमसी इतका पाणी वापर नियोजित आहे. त्याअनुषंगाने म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेचे नियोजन केले असून एकूण ३ टप्यामध्ये (स्थिर उंची -१८८ मी.) पाणी वापर उचलून त्याव्दारे जत तालुक्यातील २६५०० हे. (ICA) क्षेत्रास लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. जत तालुक्यातील पुर्णतः वंचित ४८ गांवे व मूळ योजनेतून अंशतः वंचित १७ अशा एकूण ६५ गावांना एकाच योजनेतून सिंचनाचा लाभ देणेसाठी म्हेसाळ टप्पा क्र. ३ (बेडग) मधून नविन स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे.
मंजूरीस अधिन राहुन एकूण ६ अधफु पाण्यापैकी मुळ म्हेसाळ योजनेमधून तलाव व बंधारे भरणेकरिता १ टीएमसी पाणी राखिव ठेऊन उर्वरीत ५ टीएमसी पाणी वितरणाचे नियोजन म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेमधुन प्रस्तावित करणेत आलेले आहे. उपलब्ध झालेल्या ५ अघफु पाण्यापैकी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात २६५०० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी ३.५ टीएमसी व उर्वरीत १.५० अघफू पाणी लाभक्षेत्रातील पाणीसाठे खरीप व उन्हाळी हंगामामध्ये आवश्यकते नुसार भरणे प्रस्तावीत आहे. वरील १.५ टीएमसी पाण्याचा लाभक्षेत्रातील पाणी साठ्यावर अवलंबुन असणा-या अंदाजे ११५०० हेक्टर सिंचन क्षेत्रास व जवळपासच्या गावांना पिण्यासाठी होणार आहे. वरील बाबी विचारात घेऊन प्रस्तावीत योजनेसाठी ७.२८ घमी/से विसर्गास प्रदेश कार्यालयाने मंजूरी दिली आहे व त्याची परिगणके दि. १८/११/२०२२ रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाली आहेत.
प्रकल्प घटक
योजनेचे ३ टप्पे असून प्रत्येक टप्या मध्ये ४ पंप आहेत.सदर योजनेचे टप्पा क्र. १ हे बेडग येथे असून आरग येथे वितरण हौद आहे.वितरण हौद पासून बसाप्पाचीवाडी तलाव (अग्रणी नदी) येथे असणा-या टप्पा क्र २ ला जोड प्रवाही नलिकेद्वारे जोडण्यात आले आहे.टप्पा क्र. २, कुडणूर व मिरवाड येथे असणा-या टप्पा क्र. ३ मध्ये बुस्टर पंप आहेत.योजनेचे वितरण हौद येळदरी येथे असून वितरण हौद मधून चार प्रमुख प्रवाही नलिकाद्वारे (एकूण लांबी १५०.३४ किमी.) योजनेच्या लाभक्षेत्रातील ६५ गांवाना पाणी देण्याचे नियोजन आहे. सर्वसाधारण वितरण व्यवस्था ४६२ किमी इतक्या लांबी मध्ये करावी लागणार आहे.
प्रशासकीय मान्यतेचा तपशील
केंद्रीय जल आयोगाचे पत्र क्र.११५९-११६९ दि. ३०/१०/२०१७ अन्वये कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पास मान्यता प्राप्त आहे.म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेचा समावेश कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या मान्यताप्राप्त पाचव्या सु.प्र.मा. अहवालामध्ये करणेत आलेला आहे. यास शासन निर्णय सुप्रमा १२२२/ प्र क्र / ४६१/२०२२/ मोप्र-१ दि. २९/१२/२०२२ अन्वये मान्यता मिळाली आहे. सदर म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेचा आपेक्षित खर्च १९३०.२८ (कामाचा भाग) इतका आहे.
प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र तपशील
म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेमुळे एकुण ३८००० हे. क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे. त्यातील २६५०० हे. (नव्याने समाविष्ट क्षेत्र) + ११५०० हे, (मुळ लाभक्षेत्र स्थिरीकरणामुळे)
प्रकल्पाची भौतिक स्थिती
अ) म्हैसाळ विस्तारीत टप्पा क्र. १ ते ३-*
उर्ध्वगामी नलिका लांबी- २०.६३ कि.मी, जोड प्रवाही नलिका लांबी- ३५.६० कि.मी, ३ पंपगृहे व २ वितरण हौद- कामे प्रगतीपथावर आहेत.
ब.) वितरण व्यवस्था
मुचंडी-लवंगा गृरूत्व नलिका- ६५.७४ कि.मी, कोळगिरी-गुड्डापुर गृरुत्व नलिका ४१.५० कि.मी. सव्र्व्हेक्षण कामपुर्ण व निवीदा प्रक्रिया प्रगतीत आहे.
भूसंपादन
एकूण ३५.०० हेक्टर जमीन आवश्यक आहे. सदर आवश्यक जमीन संपादन करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.
प्रकल्पाची आर्थिक स्थिती:
कृष्णा कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या पाचव्या सुचारीत प्रशासकिय मान्यतेनुसार म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेसाठी अंदाजे रु. १९३०.२८ कोटी खर्च आपेक्षित आहे.
सन २०२३-२४ साठी अर्थसंकल्पिय तरतुद- रु. ७००.०० कोटी
म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेवर जानेवारी २०२४ अखेर एकूण रु. १०२.४५ कोटी इतका खर्च झालेला आहे व कृष्णा नदीतून ७.७१ टीएमसी . तसेच वारणा धरणातुन ६ टीएमसी असा एकूण ३२.७८ टीएमसी इतका पाणी वापर नियोजित आहे. त्याअनुषंगाने म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेचे नियोजन केले असून एकूण ३ टप्यामध्ये (स्थिर उंची -१८८ मी.) पाणी वापर उचलून त्याव्दारे जत तालुक्यातील २६५०० हे. (ICA) क्षेत्रास लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. जत तालुक्यातील पुर्णतः वंचित ४८ गांवे व मूळ योजनेतून अंशतः वंचित १७ अशा एकूण ६५ गावांना एकाच योजनेतून सिंचनाचा लाभ देणेसाठी म्हेसाळ टप्पा क्र. ३ (बेडग) मधून नविन स्वतंत्र उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनासाठी पाणी पुरवठा करता येणे शक्य आहे. मंजूरीस अधिन राहुन एकूण ६ टीएमसी पाण्यापैकी मुळ म्हेसाळ योजनेमधून तलाव व बंधारे भरणेकरिता १ टीएमसी पाणी राखिव ठेऊन उर्वरीत ५ टीएमसी पाणी वितरणाचे नियोजन म्हैसाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेमधुन प्रस्तावित करणेत आलेले आहे. उपलब्ध झालेल्या ५ टीएमसी पाण्यापैकी खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात २६५०० हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी ३.५ टीएमसी व उर्वरीत १.५० टीएमसी पाणी लाभक्षेत्रातील पाणीसाठे खरीप व उन्हाळी हंगामामध्ये आवश्यकते नुसार भरणे प्रस्तावीत आहे. वरील १.५ टीएमसी पाण्याचा लाभक्षेत्रातील पाणी साठ्यावर अवलंबुन असणा-या अंदाजे ११५०० हेक्टर सिंचन क्षेत्रास व जवळपासच्या गावांना पिण्यासाठी होणार आहे. वरील बाबी विचारात घेऊन प्रस्तावीत योजनेसाठी ७.२८ घमी/से विसर्गास प्रदेश कार्यालयाने मंजूरी दिली आहे व त्याची परिगणके दि. १८/११/२०२२ रोजीच्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर झाली आहेत.