पाणीप्रश्नांसाठी २० कँन्डल मोर्चा,२१ गावबंद : पाणी परिषदेचे आयोजन

0

जत : आश्वासने, उदघाटन सोहळा नको आम्हाला पाणी द्या हीच जत पूर्व भागातील ६५ गावांची एकमुखी मागणी आहे. रक्त घ्या, पाणी द्या अशी मागणी करत चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा, श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अंकलगी व बालगाव येथे १३० हुन अधिक जणांनी रक्तदान केले पण अद्याप पाण्याबाबत ठोस भूमिका जाहीर होत नसल्याने या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे.

 

जत पूर्व भागाला पाणी द्या या एकमेव मागणीसाठी शनिवारी संख येथे हभप तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी संखचे उपसरपंच, शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष पाटील, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, शिवसेनेचे प्रविण अवरादी, जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयगोंडा, सोसायटीचे चेअरमन मैनुद्दीन जमादार,ग्रामपंचायत सदस्य सत्याप्पा हडपद, माजी सेवानिवृत्त शिक्षक आय . एम. बिराजदार, पोलीस पाटील सुरेश पाटील, डॉ. सागर पाटील, माजी सैनिक आब्बास सय्यद, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर व्ही फुटाणे, राजेंद्र बागेळी, सदाशिव पुजारी, नरेंद्र कोळी, बसगोंडा बिरादार, तुकाराम जालगेरी, सिध्दाप्पा बागेळी, मनोहर पाटील, संतोष बिरादार, ओग्याप्पा कोळी,संगोंडा बिरादार, येसाप्पा बिरादार, गोंधळेवाडीचे रामदास भोसले,डॉ नामदेव कुंभार, धानाप्पा बिरादार, आकाश पाटील यांची उपस्थिती होती.यावेळी बोलताना संखचे उपसरपंच, राष्ट्रवादीचे युवा नेते सुभाष पाटील म्हणाले हभप तुकाराम बाबा यांची धडपड आपल्या भागाला मिळावी यासाठी सुरू आहे. तुकाराम बाबांनी पाण्यासाठी संख ते मंत्रालय ५०० कि. मी. पायी दिंडी काढली. आमचे नेते, माजी मंत्री जयंत पाटील यांनी जतला पाणी उपलब्ध करून दिले आहे. बाबांचा हा लढा राजकारणविरहित लढा असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील म्हणाले,म्हैसाळचे पाणी जत तालुक्यात आले आहे. पण संखला पाणी आलेले नाही. जोपर्यत पाणी देत नाही तोपर्यत प्रत्येक गावात रक्त घ्या पण पाणी द्या हे आंदोलन तुकाराम बाबा यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून त्याला सर्वांनी बळ द्यावे असे आवाहन केले.संख ते मुंबई पायीदिंडीत आपण बाबा सोबत होतो. जतला पाणी मिळावे साठी बाबांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक झाली. पाण्यासंदर्भात नकाशा दाखवून पाणी कसे येऊ शकते.याची माहिती बाबांनी मुख्यमंत्र्यांना दिली. बाबांचा पाण्यासाठीचा संघर्ष हा आपल्यासाठी सुरू आहे. तेव्हा कँडल मोर्चा, पाणी परिषदेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेनेचे प्रविण आवरादी यांनी केले.यावेळी माजी सेवानिवृत्त शिक्षक आय. एम. बिराजदार म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यापासून आम्हाला पाणी मिळाले नाही. पाण्यासाठीचा आमचा हा लढा आर या पार रहाणार असल्याचे सांगितले. माजी सैनिक आब्बास सय्यद, सेवानिवृत्त मुख्याध्यापक आर व्ही फुटाणे, यांनी मनोगत व्यक्त केले

Rate Card

 

सोमवारपासून जनजागृती ; संखला पार पडणार पाचवी पाणी परिषद
जत पूर्व भागातील पाण्यासाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्धार संख येथील बैठकीत करण्यात आला. बैठकीत पाणी परिषद, मेळावा, गावबंद,कँन्डल मोर्चा, येत्या निवडणूकीवर बहिष्कार, म्हैसाळचे पाणी द्यावे अन्यथा कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या अशी आक्रमक भूमिका सर्वांनी घेतली आहे. बैठकीचा हा संदेश गावोगावी पोहचविण्यासाठी येत्या सोमवारपासून ६५ गावात जनजागृती मोहीम व २० फेब्रुवारीला संखमध्ये कॅडल मोर्चा, २१ फेब्रुवारीला संख गाव बंद ठेवून पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पाणी परिषदेत पुढील लढ्याची रणनिती ठरणार आहे तेव्हा सर्वांनी पाणी परिषदेला उपस्थित रहावे असे आवाहन हभप तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.