मराठा आरक्षण ; जतेत मराठा समाजाच्या बंदला प्रतिसाद

0
जत : मराठा आरक्षण संघर्ष योध्दा जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या जत बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. जीवनावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार शंभर टक्के बंद ठेवण्यात आले होते.
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे गेले सात दिवस मराठ्यांना सरसकट ओ.बी.सी.मधून अरक्षण मिळावे व त्याचबरोबर सगेसोयरेंनाही अरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी मराठा संघर्ष योध्दे मनोज जरांगेपाटील हे आमरण उपोषणाला बसले आहेत.आघाडी सरकारने लवकरात लवकर विधिमंडळ अधिवेषण बोलावून त्यामध्ये मराठ्यांच्या अरक्षणाचा प्रश्न सोडवावा अशी जरांगेसह सकलमराठा समाजाची भावना आहे.

परंतु सरकार याकडे कानाडोळा करित आहे.त्यातच जरांगे यांचा अमरण उपोषणाचा आजचा आठवा दिवस आहे.उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालल्याने सरकारने ताबडतोब मराठा अरक्षणासंदर्भात योग्य ती पाऊले उचलावीत यासाठी मनोज जरांगे यांना पाठींबा व समर्थन म्हणून आज सकल मराठा समाज जत यांच्यावतीने जत शहर बंदचे आवाहन केले होते.
त्याला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.हा बंद यशस्वीपणे पार पडावा यासाठी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते  व पदाधिकारी श्री रणधिर कदम (वकिल) ,जिल्हाध्यक्ष मराठा स्वराज्य संघ सांगली जिल्हा ,श्री.अनिल शिंदे,अध्यक्ष मराठा स्वराज्य संघ जत ,गणेश सावंत,माजी नगरसेवक प्रकाश माने,मोहन माने-पाटील,सचिन शिंदे,गणपतराव कोडग,विजयराजे चव्हाण,संग्राम राजेशिर्के,मेजर सुनिल चव्हाण, आदींसह दोनशेहून जास्त समाजबांधवानी जत शहरातील प्रमुख मार्गावरून मोटार सायकल फेरी काढली होती.जीवनावश्यक सेवा वगळता,कोणताही अनुचित प्रकार न घडता आजचा हा बंद शांततेत पार पडला.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.