गुड्डापूरच्या दानम्मा देवस्थानला कर्नाटक सरकारकडून ११ कोटीचा निधी 

0
जत : कर्नाटक सरकारने अर्थसंकल्पात जत तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थानच्या विकासासाठी तब्बल ११ कोटी रूपयाचा निधी मंजूर केला आहे. कर्नाटकतील सर्वाधिक भाविकांचे श्रंध्दास्थान असणाऱ्या या देवस्थानचा या निधीतून विकास होणार आहे,या निधीसाठी मी सातत्याने कर्नाटक सरकारकडे पाठपुरावा केला होता,त्याला यश मिळाले,असे उद्गार जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी काढले आहेत.
कर्नाटक मधील काँग्रेस सरकारने जत तालुक्यासाठी नेहमीच मोलाची भूमिका बजावली आहे.

 

विशेषतः सीमावर्ती भागात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत जनतेला अनेक सोयी उपलब्ध करून पाणी प्रश्नी देखील चांगले सहाय्य केले आहे.जत तालुक्यातील प्रसिद्ध गडी कन्नड भागातील गुड्डापूर दानम्मादेवी देवस्थानला निधी मिळावा यासाठी त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.नुकतेच कर्नाटक सरकारने बजेट सादर करीत असताना गुड्डापूर दानम्मादेवी देवस्थान साठी 11 कोटी रु. जाहीर केले आहेत. याबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री श्री.सिध्दारामया यांचे जत तालुक्याचेवतीने आभार मानले आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.