अल्पवयीन मुली टपोरी मुलांच्या जाळ्यात | मोबाईलचा दुरुपयोग..!

0

 

 १४ ते १७ वयोगटातील मुलीचं जास्त प्रमाण

सांगली : मागील काही दिवसात जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून अनेक अल्पवयीन मुलींनी पलायनच्या‌ बातम्या येत आहेत.त्याशिवाय मुलींच्या अपहरणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यातील अनेक मुली सापडल्या. मात्र,निम्यावर मुलींचा आजही ठावठिकाणा नाही. त्यामुळे सोळावं वरीसं धोक्याचं…पालकांच्या चिंतेचं ठरत आहे.

टूकार मुलांच्या जाळ्यात अल्पवयीन मुली अडकत आहेत. शाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीचे वर्ग मुलींवर जाळे पसरविण्याचे केंद्रस्थान ठरत आहेत. प्रेमाच्या आणाभाका, लग्नाचे आमिष, कुटुंबातील व्यक्तींना जीवे मारण्याची धमकी अशा विविध कारणांमुळे जाळ्यात अडकणाऱ्या १४ ते १७ वर्षांच्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे.
वर्षभरात शंभरावर अल्पवयीन मुली जाळ्यात अडकल्या. परंतु, इज्जत व प्रतिष्ठा जपण्यासाठी बहुतांश कुटुंबांनी पोलिसांची पायरी चढली नाही, ही वस्तुस्थिती आहे. १८ वर्षांपुढील मुलींनी किंवा विवाहितेने एखाद्याच्या प्रेमात पडून घर सोडल्यास, त्या हरविल्याची फिर्याद नोंदविली जाते, तर अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची फिर्याद घेतली जाते.

पोलिस खात्याच्या मदतीने सामाजिक संघटना व सजग नागरिकांनी मुलींच्या संरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. शालेय मुलींचा पाठलाग, रस्त्यावर अडवणूक, बळजबरीने बोलणे. असा प्रकार करणाऱ्या टवाळखोरांना समाजातील लोकांनी अडवावे. त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे. पोलिसांनी शिक्षा करून अद्दल घडवावी.

मोबाईलचा दुरुपयोग..!
एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबांचा सहवास असतो. हल्ली त्रिकोणी-चौकोनी कुटुंबामुळे मुला-मुलींच्या भावनिक गरजा अपुऱ्या राहतात. त्यांना मोबाईलचा आधार मिळाला. कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणासाठी घरोघरी मुलांच्या हातात मोबाईल पडला. इंटरनेटचा वापर वाढला. अवघे जग हातात आले. पाश्चात्य संस्कृतीचे आकर्षण वाढले. सोशल मीडियाद्वारे अनोळखी मित्र-मैत्रिणी निर्माण झाल्या. तशा अल्पवयीन मुली टार्गेट होत आहेत.

Rate Card
पालकांची जबाबदारी…
आपल्या मुला-मुलींशी मित्रासारखा मनमोकळा संवाद ठेवावा.मोबाईल गरजेपुरता वापरण्यास द्यावा. मोबाईल वापरावर लक्ष ठेवावे.मित्र-मैत्रिणी कोण आहेत. त्यांचे वर्तन कसे आहे. खेळीमेळीत चौकशी करावी.शाळेतील शिक्षक, शिकवणीच्या वर्गातील शिक्षकांशी संपर्कात रहावे.शिक्षकांची जबाबदारी
शाळेत मोबाईल वापरावर बंदी घालावी.भारतीय संस्कृती, कुटुंब व्यवस्था, आई-वडिलांचे महत्त्व यावर विद्यार्थ्यांशी अभ्यासक्रमबाह्य संवाद ठेवावा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.