जत येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर संपन्न  

0

सांगली : विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाकरिता व विविध शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता जात प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र पडताळणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली च्या अध्यक्षा नंदिनी आवडे यांनी केले.

 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी सांगली यांच्या वतीने श्री रामराव विद्यामंदिर जत येथे जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीर संपन्न झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी जत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अन्सार शेख, जिल्हा प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, प्राचार्य  श्री. बनसोडे आदी उपस्थित होते.

 

या कार्यक्रम प्रसंगी श्रीमती नंदिनी आवडे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विविध महसूल पुरावे व शैक्षणिक पुरावे कशा पद्धतीने शोध घेऊन त्याची पूर्तता करावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या व्यतिरिक्त व्यवसायाच्या निगडित असणारे विविध पुरावे याबाबतही मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी करताना स्वतःचा ईमेल आयडी किंवा पालकांचा ईमेल आयडी व पालकांचा संपर्क नंबर देणे अत्यंत आवश्यक आहे. स्वतःच्या व पालकांच्या ईमेल आयडी वरूनच जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन प्रक्रिया करावी, जेणेकरून ऑनलाईन जात प्रमाणपत्र पडताळणी मिळण्यास अर्जदारास अडचण येणार नाही.

 

यामुळे कागदपत्राबाबत काही त्रुटी असतील तर ते ईमेल द्वारे व संपर्कद्वारे पालकांना समजतील व जात प्रमाणपत्र पडताळणी बाबतची त्रुटी पूर्तता लवकर करता येईल व पाल्यांचे वेळेत जात प्रमाणपत्र पडताळणी होवून जात प्रमाणपत्र पडताळणी ऑनलाईन उपलब्ध होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच उपस्थितांच्या प्रश्नांचे निरासरनही श्रीमती आवडे यांनी यावेळी केले.

Rate Card

 

समतादूत प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी वेळेत करून  शैक्षणिक नुकसान टाळावे, असे आवाहन केले. यावेळी त्यांनी जात पडताळणी कशी करावी याबाबत इयत्ता अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वेळेत जात पडताळणी करून भावी काळात मिळणाऱ्या शैक्षणिक सवलतींचा लाभ घ्यावा, व्यवसाय शिक्षणात शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ऑनलाईन अर्ज कसा करावा यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र, वंशावळ कशी करावी, जातीचे प्रमाणपत्र, मूळ कागदपत्र, महसूल पुरावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. जाती प्रमाणपत्र समिती सांगली यांच्यावतीने संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कॉलेजमध्ये जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी  सांगितले.

 

प्रास्ताविक स्नेहलता ठोमरे तर सूत्रसंचालन प्रा. सकपाळ यांनी केले. आभार  जत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी अन्सार  शेख यांनी मांनले. कार्यक्रमास कवठेमहांकाळ समतादूत आबासाहेब भोसले, सलीम गवंडी, बंटी दुधाळ, विक्रम ढोणे, हेमंत चौगुले, श्री. मिसाळ, जत तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी,  शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.