म्हैसाळ विस्तार योजनेचे खरे श्रेयदार योगेश जानकरचं | प्रवीण आवराधी : दुसऱ्या टप्यातील निधी मिळाल्याबद्दल संखमध्ये जल्लोष

0
संख : येथे विस्तार योजनेच्या पाणी टेंडर प्रक्रिया निविदा पूर्ण झाल्याबद्दल जल्लोष व्यक्त करण्यात आला.आमचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला शंब्द खरा केला असून या योजनेसाठी जतचे संपर्क प्रमुख योगेश जानकर यांनी पाठपुरावा केला होता.किंबहुना त्यांनी थेट मुख्यमंत्री, संबधित मंत्री,अधिकारी यांच्याशी समन्वय साधून योजनेला निधी मिळवून दिला आहे.त्यामुळे या योजनेचे खरे श्रेय योगेश जानकर यांचेच असल्याचे शिवसेनेचे जत तालुका विधानसभा प्रमुख प्रवीण आवराधी यांनी सांगितले.

 

 

आवराधी पुढे म्हणाले,जानकर व तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या विस्तारित योजनेसाठी दोन हजार कोटीच्या कामाची घोषणा करण्यात आली होती.मुख्यमंत्री यांनी जत तालुक्यासाठी संपर्कप्रमुख म्हणून योगेश जानकर यांची नियुक्ती झाली.नियुक्तीनंतर योगेश जानकर यांनी जत तालुका दौरा केला दौऱ्या दरम्यान त्यांच्या लक्षात आले की जत तालुक्याला गेली 75 वर्ष जत तालुक्यातील पूर्व भागातील 65 गावांना अजून पर्यंत पाणी मिळाले नाही.पाण्यासाठी येथील जनता त्रस्त आहे मेटा कुठीला आली आहे.जनता पाण्यासाठी आक्रोश करत आहे आणि कर्नाटक जाण्यासाठी मागणी करतायेत.ही वस्तुस्थिती पाहताच जानकर यांनी मुख्यमंत्री यांना जत तालुक्यातील व्यथा मांडली.

 

तालुक्यातील पदाधिकारी, जलसंपदाचे अधिकारी,मंत्रीमहोदय यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये जत तालुक्याला पाणी कसे देता येईल आणि कोणत्या प्रकारे पाणी जनतेपर्यंत पोहोचता येईल याची माहिती घेतली.परिस्थिची ‌पाहणी करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जत तालुक्यात दौरा केला.यानंतर परत सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक झाली.या बैठकीमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी जत तालुक्यासाठी विस्तार योजनेसाठी पाण्यासाठी तब्बल २ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून दिला.त्यानंतर प्रथम 981 कोटी रुपयांची टेंडर काढण्यात आले.

 

त्याचे कामही गेले चार महिने प्रचंड गतीने सुरू असून जवळपास १६ किलोमीटीरची भलीमोठी पाईपलाईन टाकण्यात आली आहे.आता दुसऱ्या टप्प्याचे कामासाठी एक हजार कोटी रुपयांची गरज होती.तेही टेंडर मुख्यमंत्री शिंदे यांनी आज काढले असून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.खऱ्या अर्थाने या योजनचे खरे श्रेय योगेश जानकर यांचे असल्याचेही प्रवीण आवराधी यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख आनंद पवार यांच्या समवेत कोल्हापूर येथे आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.तेथे दहा ‌दिवसात हे टेंडर काढून ‌जतचा पाणीप्रश्न कायमचा‌ संपवू असे आश्वासन दिले होते.

 

टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.आता जत तालुक्यात हरिक्रांती येणार हे निश्चित आहे,असेही आवराधी म्हणाले.दरम्यान आज आज संख येथे जत तालुका शिवसेनेच्या वतीने फटाक्ये फोडत जल्लोष व्यक्त करण्यात आला. मिठाई वाटण्यात आली.यावेळी तालुकाप्रमुख अंकुश हिवाळे, उपजिल्हाप्रमुख तमा कुळाल,जत तालुका विधानसभा प्रमुख प्रवीण आवराधी, गोंधळवाडीचे चेअरमन बिराप्पा मुर्गे तिकुंडी करेवाडीचे सरपंच बाळासाहेब थोरात,शशिकांत पाटील,ग्रामपंचायत सदस्य गुडोपंत करंडे,भीमराव पाटील, मंजुनाथ पुजारी,अंकुश ठोंबरे,अण्णाप्पा ठोंबरे,संतोष बिरादार,मिलिंद टोने,रवी कुलकर्णी,चनबसु गुजरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी शिवसेना नेते योगेश जानकर यांचा आभार मानण्यात आले.
Rate Card
संख ता.जत येथे पेढे वाटप, फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.