नवी दिल्ली : सर्वत्र गांज्या विक्रीवर बंदी असताना जर्मनी संसदेने एक गांज्याबाबत कायदा संमत केला आहे. जो जर्मनीच्या लोकांना त्यांच्या घरात गांजाची झाडे लावण्याची परवानगी देतो.जर्मन संसदेत विरोधी पक्षाच्या तीव्र विरोधानंतरही गेल्या शुक्रवारी हा कायद्या मंजुर झाला आहे. गांजाचा वापर कायदेशीरचं पंतप्रधान ओलाफ स्कोल्झ यांच्या पाठिंब्याने हा कायदा मंजूर करण्यात आला.
जर्मन संसदेने पारीत कायद्यानुसार एखाद्या व्यक्तीला घरी 3 पर्यंत गांजाची रोपे वाढवण्याची परवानगी मिळाली आहे. अलीकडे जर्मन तरुणांमध्ये गांजाचा वापर वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गांज्याची काळ्या बाजारात विक्री वाढली. ती बंद करून कायदेशीर केली तरच या विक्रीवर नियंत्रण ठेवता येईल, असे ते म्हणाले.दरम्यान अंमली पदार्थ असणाऱ्या या कायद्यामुळे जर्मनीत गांज्याची काळ्या बाजारातील विक्रीवर नियंत्रण येईल असे सरकारला वाटत आहे.