सामान्यातील असामान्य संजयजी घोडावत

0
22
“सुशीलेच्या सुसंस्कारातून घडला,
दानचंदांची दानशूरता शिकला,
नीतिमत्तेची नीताभाभीची साथ सोबतीला,
मग कोणत्याही पराजयाची भीती संजयजीना कशाला?”
संजयजी दानचंदजी घोडावत नावाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात जय म्हणजेच यश प्राप्त करणारे हे व्यक्तिमत्व.
दिडवाना राजस्थान येथील त्यांचे मूळ घराणे असले तरी व्यवसायाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रात आले आणि कायमचेच मराठी झाले.’अँल्युमिनिअमच्या शिटस’ बनवण्याचा पहिला व्यवसाय १९८८ साली सुरु केला.स्वतः चे नशीब त्यांना आजमावयाचे होते. टनशीबाला कष्टाचीही साथ होतीच पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते. दुर्दैवाने हा व्यवसाय तोट्यात गेला.पुन्हा नवीन उद्योग १९९३ साली ‘घोडावत इंडस्ट्रीज’ या नावाने सुरु केला. स्वतः गावोगावी फिरून कन्झ्युमर प्रोडक्ट मार्केटिंगचे काम संजयजींनी केले. सुरुवातीला कोल्हापूरच्या खेडयापाड्यात स्कूटरवरून फिरणारा हा माणूस भविष्यात हेलिकॉप्टरमधून फिरेल असे भविष्य जरी कोणी सांगितले असते तरी त्यावरही कोणी विश्वास ठेवला नसता.

 

 

पण संजयजींकडे असणा-या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम या त्रिसुत्रीमुळे त्यांनी उदयोग क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमठवला. पाहता आणि पाहता पाहता ते  ‘स्टार’ बनले.सन १९९७ साली स्टार ऑक्सेकेमची स्थापना केली.सन २००५ सालापासून ‘स्टार लाईन’ या ब्रँडखाली ‌‍घोडावत टेक्सस्टाईलमध्ये  कॉटन, लायक्रा, लिनन, प्लेन, ड्रील यामध्ये विविध प्रकारचे कापड तयार केले जात आहे. सन २०११ साली घोडावत मायनिंग म्हणजेच खाणकाम उद्योग सुरू केला.
२०१५ साली नैसर्गिक ऊर्जेचा वापर करून ‘रेनोम एनर्जी सर्व्हिसेस’ या माध्यमातून भारतातील पहिली विंड टर्बाइनचे व्यवस्थापन करणारी कंपनी सुरु केली.

 

 

तत्पूर्वी २००५ श्रेणिक इंडस्ट्रीज विंड ऑपरेट टर्बाइनसाठी डिझाईन केलेले स्टील ट्यूबलर टॉवर्सचे उत्पादन सुरु केले होते.२०१८ साली ‘घोडावत सॉफ्टटेक’ ही आयटी क्षेत्रात काम करणारी संस्थाही सुरु केली. संजयजींनी २००९ साली संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स या माध्यमातून शिक्षण संकूल उभे केले.  परदेशातील एखादया नामवंत वि‌द्यापीठाला लाजवेल इतक्या अत्याधुनिक सुविधा, स्वच्छता व दर्जेदार शिक्षण त्यांनी आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले.18000 हुन अधिक विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. बेंगळूरू व बेळगावी या विमानतळावरून मुंबई, जयपूर, अहमदाबाद, तिरुपती, हैद्राबाद, पुणे, नागपूर, सुरत, लखनऊ या सारख्या प्रमुख २२ शहरांमध्ये ‘स्टार एअरलाईन्स’ काम करते.

 

 

संजय घोडावत ग्रुपकडे स्वतःची ३ हेलिकॉप्टर व ९ विमाने आहेत.  संजय घोडावत समूहामध्ये आज १६,००० पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. ज्याची सुरुवात अवघ्या 2 कर्मचाऱ्यांपासून झाली होती. ‘इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा  वेलू गेला गगनावरी’ सन २०२७ पर्यंत संजय घोडावत ग्रुपची वार्षिक उलाढाल ८५०० करोड करण्याचे ध्येय असल्याचे संजयजी सांगतात.
शब्दांकन : प्रा.संदीप व्हनाळे
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here