चिंचली मायाक्कादेवीची यात्रेचा आज मुख्य दिवस | जत तालुक्यातील लाखावर भाविक दाखल | कानड्या लाडीचा‌ गजर

0
जत: जतसह सांगली जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या चिंचली मायाक्कादेवीची यात्रा २४ फेब्रुवारी ते ३ मार्च कालावधित भरत आहे. बुधवारी २८ रोजी देवीचा नैवेद्य अर्पण करण्याचा दिवस आहे.भाविक बैलगाड्यांसह तसेच मिळेल त्या वाहनाने चिंचलीकडे जाताना दिसत आहेत. कर्नाटकात चिंचली मायाक्का देवस्थान आहे. देवीला कानडी लाडी असेही म्हणतात. चिंचली येथे मायाक्का देवीचे प्राचीन मंदिर आहे.

 

पौर्णिमेपासून यात्रेला सुरुवात होते.२८ फेब्रुवारी हा मुख्य दिवस असून या दिवशी मायाक्का देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात येतो.याचदिवशी
देवीची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी बाहेर निघते.यात्रेसाठी जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मायाक्कादेवीचे भक्त बैलगाडीतून, दुचाकी व चारचाकी
वाहनातून यात्रेला निघाले आहेत.विशेषतः यात्रेला जाणाऱ्या बैलगाड्या लक्ष वेधून घेत आहेत.

 

आठवडाभराचा त्यांचा संसार बैलगाडीतच थाटला आहे. बैलांच्या शिंगाला रिबन, शेंव्या,पाठीवरती झूल, गळ्यात चाळ, पायात घुंगरू अशी नटलेली बैलजोडी,गाडीला रंगीबेरंगी छत अशी आकर्षक सजावट पाहायला मिळत आहे. यात्रा कालावधित कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रायबाग तालुका पोलिस प्रशासन कामाला लागले आहे. तालुक्यातील भाविक मोठ्या संख्येने जात आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.