जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील उमदी येथील निवृत्ती गुंडा शिंदे यांची शिवसेनेचे जत तालुका विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली.
सांगली शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदबापू पवार यांच्या उपस्थितीत निवृत्ती शिंदे यांना निवडीचे पत्र देण्यात आले.यावेळी केशव पाटील यांचीही उमदी जिल्हा परिषद गटाचे विभाग प्रमुखपदी निवड करण्यात आली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जत तालुका शिवसेना संपर्क प्रमुख योगेश जानकर यांच्या सूचनेनुसार निवृत्ती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
इस्लामपूर येथील सांगली जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवृत्ती शिंदे यांना जत तालुका विधानसभा प्रमुखपदी निवडीचे पत्र शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद बापू पवार यांच्या हस्ते देवून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख तम्मा कुलाल,तालुका अध्यक्ष अंकुश हुवाळे,वाळव्याचे तालुका अध्यक्ष सागर मलगुंडे, युवा सेना तालुका प्रमुख प्रवीण अवरादी,नेताजी टेंगले,सिद्धू मडवळे, रियाज शेख,बिराप्पा मुर्गे, मिलिंद टोने, गेनेप्पा कोरे,अजय कर्वे आदी शिवसैनिक उपस्थित होते.