संख : जत तालुका संख येथील जि.प.प्राथमिक कन्नड शाळा व्हनगोंड वस्ती शाळा संख येथील (वाल कंपाउंड)संरक्षण भिंतचे ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोग निधीतून मंजूर या कामाचे नारळ फोडून उद्घाटन उपसरपंच सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.जत तालुका पूर्व भागातील संख येथील जि.प.प्राथमिक कन्नड शाळा व्हनगोंड वस्ती शाळा संख येथील ग्रामपंचायत च्या15 व्या वित्त आयोग निधीतून (वाल कंपाउंड )संरक्षण भिंतचे उदघाटन करण्यात आले. संख पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेले जि. प.प्राथमिक कन्नड शाळा व्हनगोंड वस्ती येथील शाळेत येणारे मुले – मुली यांच्या संरक्षणसाठी भिंत गरज होती ते ग्रामपंचायत 15 व्या वित्त आयोग योजनेतून निधी मंजूर करण्यात आली आहे.
या कामाचे उदघाटन प्रसंगी संखचे युवा नेते उपसरपंच सुभाष पाटील, दयगोंडा बिरादार,मलिकार्जून सायंगाव,पोलीस पाटील सुरेश पाटील,आय.एम.बिरादार,सोसायटी चेअरमन मैनूद्दीन जमादार, साहेबराव ठोणे,रमेश कनमडी,शाळा व्यवस्थापक अध्यक्ष विठ्ठल बिरादार, मुख्यध्यापक उमाकांत भासगी,मलिकार्जून बिरादार,परगोंडा बिरादार,कॉन्टॅक्टदार पिंटू बिराजदार व सर्व ग्रामपंचायत सदस्य,सोसायटी सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.