जत : जत तालुक्यातील जत तालुक्यातील वाळेखिंडी,सोरडी, शिंगनहळळी,नवाळवाडी,निगडी खुर्द, लोहगाव,दरिकोनूर,व्हसपेठ,आवंढी या गावांचा डोंगरी विकास कार्यक्रम कार्यक्रमांतर्गत डोंगरी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेली आहेत.राज्यातील सर्व विभागांचा समतोल विकास करीत असताना डोंगरी विभागांचा काही विशिष्ट गरजा असल्याचे लक्षात आढळून आल्याने डोंगरी विभागाचा विकास करण्यासाठी या भागाचे प्रश्न समजून घेण्याचा उद्देशाने तसेच राज्यातील डोंगरी विभागाचे क्षेत्र विशेष निकषाच्या आधारे निश्चित करून त्यांच्या विकासासाठी खास कार्यक्रम घेण्याच्या हेतूने डोंगरी गावांची यादी प्रसिद्ध करणेत येते.
त्यामध्ये जत तालुक्यातील जत तालुक्यातील वाळेखिंडी सोरडी सिंगनाहळी नवाळवाडी निगडी खुर्द लोहगाव व्हसपेट दरीकोनुर आवंढी या गावांचा आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नामुळे समावेश करण्यात आला आहे.त्यामुळे या या गावांसाठी डोंगरी विकास योजनेअंतर्गत अधिकचा निधी व सेवा सुविधा सवलती मिळणार आहेत.