उमदीत द्राक्ष,डाळिंब बागांना टँकरने पाणी,शेतकरी आर्थकारण बिघडले

0
उमदी,संकेत टाइम्स : उमदी व परिसरात दिवसेंदिवस तीव्र पाणी टंचाई निर्माण होत आहे.झाडे जगली तर आम्ही जगतो नाहीतर जगणे मुश्कील होईल, या भीतीने येथील शेतकरी टँकरने शेतीला पाणी देत आहे.येथील शेतकऱ्यांना आपण जगण्याबरोबर आपली द्राक्ष, डाळींब झाडे जगली पाहिजे म्हणून पाणी विकत आणून झाडे जगविली जात आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थकारण बिघडले आहे.
दहा हजार लिटर पाण्याच्या टँकरला तीन हजार रुपये मोजावी लागत आहेत.एक एकरला एक दिवसा आड एका टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो,त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावेळी मार्च महिन्यात दरवर्षी अवकाळी पावसाने हजेरी लावत होती,मात्र यावेळी अवकाळी पाऊस पडला नाही.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अवकाळी पाऊस न झाल्यास कांहीं दिवसातच पैसे देवूनही टँकर भरायला पाणी मिळणे कठीण होणार आहे.
उमदी जवळील दोड्डानाला तलाव जवळील शेतकऱ्यांच्या बोअर आणि विहिरीतून पाणी विकत आणून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.काही शेतकरी मंगळवेढा तालुक्यातील उमदी जवळील गावातून टँकरने पाणी विकत आणून पिकांना देत आहेत.एकंदरीत शासनाने याकडे तातडीने लक्ष देवून मागेल त्याला टँकर आणि चारा डेपो सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.