बांधकाम कामगार लाभाचे ऑनलाईन पोर्टल सुरू करावे

0
सांगली : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने नोंदणी, नूतनीकरण,लाभाचे ऑनलाईन अर्जाचे पोर्टल बंद केले आहे.ते पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनातील म्हटले आहे कि,लाभाचे अर्ज भरण्यासाठी कामगार नोंदीत असणे गरजेचे आहे.जो कामगार आचारसंहिता लागण्यापूर्वी, म्हणजेच १६ मार्च २०२४ पूर्वी नोंदीत झालेला आहे अशा कामगारांचे लाभाचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू करावे. तसेच नूतनीकरणाचे कामकाज हे रेग्युलर काम असल्याने नूतनीकरणाचे पोर्टलही सुरू करावे.

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.