डफळापूर, बेंळूखी मिरवाड तलावाच्या कँनॉलला बंधिस्त नलिका टाकाव्यात | दिग्विजय चव्हाण यांची मागणी

0
डफळापूर : जत पश्चिम भागातील शेतीला आधार ठरलेल्या डफळापूर,बेंळूखी व मिरवाड तलावाचे कँनॉलची दुरूस्ती करण्यापेक्षा तेथे बंधिस्त पाईपलाईन टाकून तलावाखालील शेती ओलीताखाली आणावी,अशी मागणी पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी जलसंपदा विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनात म्हटले आहे की,जत पश्चिम भागातील शेतीसाठी डफळापूर, बेंळूखी व मिरवाड हे तलाव सुमारे ३० वर्षापुर्वी बांधण्यात आले आहेत.त्याचे लाभक्षेत्र वाढविण्यासाठी तलावातून कँनॉल काढण्यात आले आहेत.मात्र अपवाद वगळता हे कँनॉल बंद आहेत.त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
कँनॉलमध्ये वाढलेली झाडे झुडपे,आतमध्ये पडलेल्या चिरा,उंदीर,घुसी यासारख्या प्राण्याने पाडलेली बिळे यामुळे कँनॉलमधून वाहणारे पाण्यापैंकी मोठ्या प्रमाणात पाणी चिरा,बिळामधून वाया जात आहे.त्याचे दुरूस्ती करण्याची सध्या गरज आहे.

 

चव्हाण म्हणाले,अनेक वर्षापासून या कँनॉलची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे.या कँनॉलची दुरूस्ती,झाडे-झुडपे काढणे,सिमेंटीकरण करणेसाठी निधी खर्च करण्यापेक्षा तलावापासून कँनॉलमधून
बंधिस्त पाईपलाईन टाकून पाणी शेतकऱ्यांना थेट बांधावर पाणी द्यावे.जणेकरून सततचा दुरूस्ती खर्च,वाया जाणारे पाणी वाचविता येणार आहे.शिवाय अशा पाईपलाईनमधून पाणी आल्यास कँनॉल फोडाफोडी प्रकारांना आळा बसणार आहे.

 

जेथे पाणी द्यायचे तेथेच पाणी देणें या पाईपलाईन टाकल्यास शक्य होणार आहे.थेट बांधावर पाणी मिळाल्याने एकतर मोठे लाभक्षेत्र ओलिताखाली येणार आहे.त्यामुळे डफळापूर,बेंळूखी,मिरवाड तलावाच्या कँनॉलच्या दुरूस्ती न करता त्यातून बंधिस्त पाईपलाईन टाकून पाणी सोडावे.जलसंपदा विभागाने तातडीने ‌सर्व्हे करून पाईपलाईन टाकण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही दिग्विजय चव्हाण यांनी केली आहे.
तिन्ही तलावातील कँनॉल बंधिस्त पाईपलाईन टाका
जत पश्चिम भागातील सतत मागणी असणाऱ्या बेंळूखी,मिरवाड,डफळापूर या तलावांची कालवा वितरण व्यवस्था बंधिस्त पाईपलाईन व्हावी,विमोचक विहिरी नादुरूस्त झालेल्या आहेत,त्या दुरुस्त कराव्यात.प्रशासनाने आपला कायमस्वरूपी खर्च वाचविण्यासाठी तिन्ही तलावाचे कँनॉल बंधिस्त नलिका( PDN)कराव्यात,असेही चव्हाण म्हणाले.
डफळापूर,बेंळूखी,मिरवाड तलावाच्या कँनॉलला बंधिस्त पाईपलाईन टाकून करावेत,या मागणीचे निवेदन देण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.