म्हैसाळ योजनेची कामे निकृष्ठ | सुनिल पवार,शशिंकात कोडग याचा आरोप : एसीत बसून ‌सर्व्हे,कमिशनखोरीमुळे बोजवारा

0
8
जत : मूळ म्हैसाळ योजना व वितरिका ही जरी अर्ध्या जत तालुक्यासाठी वरदायिनी ठरत असली तरी म्हैसाळ योजनेवर काम करणार्‍या अधिकार्‍यांसाठी वाहती गंगा बनली आहे.वातानुकुलीत खोलीत बसून केलेले सर्व्हे,नित्कृष्ट दर्जाची कामे,अधिकारी व कंत्राटदार यांच्यातील अर्थपूर्ण व्यवहारांमुळे म्हैसाळ योजनेचा बोजवारा उडालेला आहे.मग ती खलाटी पंपगृह ब पासून शेड्याळपर्यंतची पाईपलाईन असो,अथवा अंतराळपासून आवंढीपर्यंतची पाईपलाईन असो,नित्कृष्ट दर्जाचे साहीत्य वापरून केलेले लायनिंगची कामे असो,प्रत्येक बाबतीत प्रचंड काळाबाजार झाला आहे,असा आरोप राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष सुनिल पवार व आवंढी ग्रामपंचायत सदस्य शशिंकात कोडग यांनी केला असून याबाबत आम्ही रितसर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही पवार व कोडग यांनी सांगितले.

 

पवार,कोडग म्हणाले,सर्व अधिकार्‍यांचे धोरण हे कंत्राटदार धार्जिने आहे.शेतकरी हा सर्वात शेवटचा घटक बनलेला आहे.संपूर्ण जत तालुक्यातून शेकडो कोटींची कमिशने पोहोचलेली आहेत.अनेक अधिकार्‍यांनी अमाप माया जमा केली आहे.चार वर्षापूर्वी नोकरीला लागलेला अभियंता करोडो रूपयांची मालमत्ता बाळगून आहे,आणि जे प्रस्थापित अधिकारी आहेत.त्यांच्या मालमत्तेचे आकडे पाहून चक्कर येईल अशी स्थिती आहे.आम्ही आतापर्यंत तिकडे कानाडोळा करत होतो,पण आता आमच्या शेतकर्‍यांच्या अंगावर जर हे अधिकारी पोकलेन मशिन घालणार असतील तर या अधिकार्‍यांचे सोलापूर,पुणे,लोणावळा व टेंभुर्णी हायवेवरील अनेक बेनामी व नामी मालमत्तांचे उतारे लाचलुचपत खात्यांकडे देणार असल्याचेही पवार व कोडग यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना धमकावण्याचे प्रकार
जत तालुक्यात म्हैसाळ योजनेसह नव्याने होत असलेल्या विस्तारित म्हैसाळ योजनेची कामे गतीने सुरू आहेत.हे करत असताना अनेक नियम,अटी व कायदा पायदळी तुडवून शेतकऱ्यांचे वारेमाफ नुकसान करत कामे सुरू असल्याचे आरोप सातत्याने शेतकऱ्यांकडून होत आहेत.मात्र पाणी मिळेल या आशेने आमचे शेतकरी सर्व सहन करत आहेत. मात्र यापुढे शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई देण्याबरोबरचं त्यांच्या अडचणी न सोडवता त्यांच्यावर दादागिरी अथवा गुन्हा दाखल करण्याची भिती दाखविल्यास आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू असा इशाराही पवार व कोडग यांनी दिला आहे.
आवंढी परिसरात बंधिस्त पाईपलाईनच्या पाईप्स अशा पाणी येण्याअगोदरचं उघड्या पडल्या आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here