आटपाडी : आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांनी आटपाडी तालुक्यातील चारा व पाणी नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी गटविकास अधिकारी मुक्तेश्वर माडगूळकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.तालुक्यात ५८ हजार पशुधन असून दीड महिन्यापूर्वी ६५ दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध होता. तहसीलदार सागर ढवळे यांनी सर्व मंडल कृषी अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी, तलाठी यांनी १० एप्रिलपर्यंत उपलब्ध चाऱ्याची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच उपलब्ध असणाऱ्या चाऱ्याबाबत माहिती गोळा करून पुढील आढावा बैठकीत जनावरांच्या चाऱ्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.आटपाडी तालुका दुष्काळ म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे आढावा घेऊन तालुक्यात चारा छावण्या सुरू करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे बैठकीमध्ये ठरले असल्याची माहिती पुरवठा अधिकारी दादासाहेब पुकळे यांनी दिली.