सोशल मीडियामुळं झोपेचं झालं खोबरं; झोपेच्या कमी कालावधीमुळं आरोग्य आणि  मानवी वर्तनावर परिणाम

0
बालपणापासून ते पौगंडावस्थे (किशोरावस्था)पर्यंत मानवी शरीराला आठ ते दहा तासांची झोप गरजेची असते. पण गंमत अशी आहे की मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या झपाट्याने वाढत चाललेल्या  विस्तारामुळं या वयोगटाच्या मुलांच्या झोपेवर सर्वाधिक हल्ला चढवला गेला आहे. जीवनशैलीतील बदल आणि औषधाशी संबंधित सर्व मानके आणि संकेतक या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत आहेत की देशात आणि जगात सोशल मीडियाचा वापर वाढत असताना, आपल्या झोपेचा कालावधी आणि त्याची गुणवत्ता कमी होत आहे. समस्या केवळ झोपेची कमतरता नसून, झोपेच्या वेळी डिजिटल स्क्रीनच्या प्रकाशाचा आपल्या डोळ्यांद्वारे आणि मेंदूच्या सर्व तंतूंवर विपरीत परिणाम होतो.
ही ‘लाइट सर्कॅडियन रिदम’, जी २४ तासांच्या कालावधीत शरीर आणि मेंदूला आराम देते आणि ताजेतवाने करते. आता याच झोपेच्या नैसर्गिक किंवा आंतरिक प्रक्रियेत व्यत्यय येत आहे. Social media has made it difficult to sleep रात्री उशिरापर्यंत मोबाईल फोन वापरल्याने शरीराची ऊर्जा होते कमी
Rate Card
.जगभरात असे अनेक अभ्यास आणि सर्वेक्षण झाले आहेत ज्यावरून असे दिसून आले आहे की रात्री अंथरुणावर आडवे झाल्यावर मोबाईल फोनचा वापर जागतिक स्तरावर वाढला आहे. त्यामुळे शरीर पुरेशी झोप मिळाल्यावर आपोआप मिळणारी ऊर्जा आणि जोम यापासून वंचित राहते. विकसित देशांमध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की सुमारे पंच्याण्णव टक्के किशोरवयीन मुलांकडे स्मार्टफोन आहेत, त्यापैकी पंचेचाळीस टक्के तरुणांनी कबूल केले की ते जवळजवळ सर्व वेळ मोबाइलवर ‘ऑनलाइन’ असतात. पौगंडावस्थेतील आणि तरुणांमधील ही प्रवृत्ती जागतिक आहे, म्हणून या वयोगटाला मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक धोका आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.