जांभूळवाडीजवळ क्रुझर लक्झरी बसला धडकली ; ७ ठार,८ जखमी | लग्न कार्याला चाललेल्या कुंटुबावर काळाचा घाला

0
15

जत : विजापूर-गुहागर महामार्गावरील जांभूळवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथे क्रुझर गाडीची ट्रँव्हल्सला पाठीमागून जोरदार धडक झाल्याने भिषण अपघातात लग्न कार्यासाठी चाललेल्या कुंटुबांतील सात जण ठार झाल्याची माहिती रात्री उशिराने समोर आली.अन्य आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.सावर्डे(तासगाव) येथे लग्न कार्यासाठी चालेल्या कुंटुबांवर काळाने घाला घातला आहे.मृत्ताचा आकडा वाढण्याची शक्यता‌ व्यक्त होत आहे

 

सर्व मृत्त हे कर्नाटकातील असून ते तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे आज सकाळी हळदीचा कार्यक्रमासाठी क्रुझर गाडीने निघाले होते.बुधवारी रात्री ८ ते ८.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे.कर्नाटकातील जमखंडी येथील हे सर्व कुंटुबीय असल्याची माहिती मिळत आहे.विजापूर-गुहागर महामार्गावर हा भिषण अपघात घडला आहे.टँव्हलला क्रुझरने पाठीमागून धडक बसल्याने ट्रँव्हलमध्ये क्रुझरचा इंजिनचा भाग घुसल्याने भिषण अपघात झाला.त्यात क्रुझरमधिल सात जण मृत्त झाले आहेत,तर उर्वरित आठ जणही गंभीर जखमी झाले आहेत.

 

 

अपघात इतका भिषण होता की क्रुझरचा‌ पुढील भागाचा चेदामेंदा झाला आहे.घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले होते.पोलीसांना माहिती मिळताच कवटेमहांकाळ पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.रात्री उशिरापर्यत पंचनाम्याचे काम सुरू असल्याने अपघातातील मृत्ताची नावे व वाहनाची पुर्ण माहिती मिळू शकली नाही.

 

त्यामुळे चालकासहित पुढच्या बाजूला बसलेल्या प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर उर्वरित लोक गंभीररित्या जखमी झाले. या सर्व जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. क्रुझरमधील सर्वजण सावर्डेकडे लग्नसमारंभासाठी जात होते. मात्र, त्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.

 

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here