जतच्या‌ भाजपा मेळाव्यात विविध पदाधिकारी निवडीची घोषणा

0
जत : दि.९ मार्चला महायुतीचा मेळावा संपन्न झाला.मेळाव्यासाठी महायुतीचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, महायुतीचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील, पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, विधान परिषदेचे आमदार  गोपीचंद पडळकर, भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे, लोकसभा विस्तारक तात्या बिरजे, जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रविपाटील यांच्यासह बूथ प्रमुख,सुपर वॉरियर्स जिल्हा व तालुका कार्यकारणी सदस्य महायुतीतील मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

या मेळाव्यात हणमंत तायाप्पा गडदे यांची भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा भटके विमुक्त प्रकोष्ठ सेल अध्यक्षपदी व विद्यार्थी संघटना जिल्हा उपाध्यक्षपदी पिराप्पा कोळी निवड करण्यात आली.निवडीचे पत्र खासदार संजयकाका पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष निशिकांत दादा भोसले-पाटील,तम्मनगौडा रविपाटील यांच्याहस्ते देण्यात आले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.