राष्ट्रीय संत गाडगेबाबा, वैराग्यसंपन्न श्री संत बागडेबाबा यांच्या पावलावर पाऊल ठेवत समाजकार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे तुकाराम बाबा महाराज यांनी २०१७ मध्ये चैत्र वारीला पायी दिंडी सुरु केली. मागील वर्षी चैत्र वारी पायी दिंडीत पुढील वर्षी संपूर्ण सागवानी रथ तयार करण्याचा मानस भक्तांनी व्यक्त केला.भक्तांचा हा संकल्प पूर्ण झाला. यंदाच्या चैत्रवारीत हा रथ सहभागी झाला होता.हभप अमृत पाटील जालिहाळ यांच्यासह भाविकांनी हा रथ पूर्ण व्हावा यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हा रथ चिक्कलगी भुयार येथे आणण्यात आला होता.१६ एप्रिलला चिक्कलगी भुयार येथून चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तुकाराम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चैत्रवारीला प्रारंभ झाला.चिक्कलगी भुयार मठ,जालिहाळ, गुंजेगाव मार्गे पायी दिंडी पंढरपूर येथील श्री संत बागडेबाबा मठात पोहचली. वारी दिवशी पंढरपूरला पायी दिंडीने नगर प्रदक्षिणा केल्याने श्री विठ्ठल -रुक्मिणीच्या दर्शनाने पायी दिंडीची सांगता झाली. तत्पूर्वी श्री संत बागडेबाबा मठामध्ये तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या ओघवत्या शैलीत भाविकांना मार्गदर्शन केले.विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर दिंडीने चिक्कलगी भुयारकडे प्रयाण केले. दिंडी मारोळी येथे येताच ग्रामस्थांनी ही दिंडी यशस्वी करण्यात, दिंडीची शोभा वाढविण्यात आपल्या गावातील रेवणसिद्ध मलाबादी यांच्या बैलजोडीचा वाटा मोठा असल्याने त्या बैलजोडीची जंगी मिरवणूक गावातून काढण्याचा निर्णय घेतला त्यानुसार गावात दिंडी येताच बैलजोडीची जंगी मिरवणूक गावातील प्रमुख मार्गातून काढण्यात आली. हभप तुकाराम बाबा महाराज यांचाही ग्रामस्थांनी सत्कार केला.
यावेळी मारोळीचे सरपंच बसवराज पाटील, चेअरमन सोमनिंग हत्ताळी, माजी उपसरपंच शंकराप्पा बिराजदार, पोलीस पाटील शिवाप्पा पाटील, अमृत पाटील, रामनिंग मेडीदार, सिद्धू उमराणी, भारत खांडेकर, निमोणी येथील ढगे महाराज, शंकर पाटील, राजू चौगुले, प्रदीप पाटील सिद्धू मंडडुर, नामदेव मलाबादी, पुंडलिक मलाबादी, पिलू मेडीदार, बसू बिराजदार, तुकाराम मलाबादी, हनुमंत मलाबादी, राजू हत्ताळी, धरमु मलाबादी, बसू बागेळी, शिव मेडीदार, पिंटू मेडीदार, कांशीराम रवी, चंदू हत्ताळी, चंदू रवी, सिद्धू मलाबादी, शिवराया हत्ताळी महाराज, सिद्धमला रवी, मललेशा हत्ताळी, शिवाजी माने, समा बंडगर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी होते.
चैत्र वारीला तुकाराम बाबांचे दुष्काळ मुक्तीचे साकडे
जत, मंगळवेढा हे दोन्ही तालुके दुष्काळी तालुके. या तालुक्यांचा दुष्काळ कायमचा हटवायचा असेल तर रखडलेल्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होवू दे, या दोन्ही तालुक्यातील दुष्काळ कायमचा हटू दे असे साकडे हभप तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी पांडुरंगाला घातले.
फोटो
मारोळी येथील ग्रामस्थांनी बैलजोडीची जंगी मिरवणूक काढत फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत स्वागत केले.