जत तालुक्यात नवे कोरोना बाधित 50 च्या आत,तिघाचा मुत्यू

0
7



जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात कोरोनाचे रुग्ण कमी आढळून येत‌ आहेत.मात्र दुसरीकडे 7 जणाचा मुत्यू झाल्याने भिती कायम आहे.पुन्हा एकदा तालुक्यातील बाधित आकडा 50 च्या आत आला आहे.तालुक्यात मंगळवारी 41 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.





तालुक्यातील मुत्यू झालेला रुग्णाची संख्या 230 वर पोहचले आहेत.

दुसरीकडे बाधित रुग्णाची संख्या 10,119 वर पोहचली आहे. तर 8,860 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या तालुक्यात 1022 रुग्ण उपचाराखाली आहेत.





तालुक्यातील कोरोना बाधित संख्या कमी होत असताच मुत्यू होणारी संख्या चिंता वाढविणारी आहे.त्यातच निर्बंध शिथील झाल्याने शहरासह तालुक्यातील दुकाने उघडण्यात आली आहेत.अत्यावश्यक सोडूनही अनेक दुकाने चालू झाल्याने एकच गर्दी उसळत आहेत.





त्यामुळे कोरोना नियमाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोना धोका मानगूटीवर कायम आहे. जत 4,शेड्याळ 2,वळसंग‌1,उटगी 3,निगडी बु 1, वाषाण 1,करेवाडी को 1,सिध्दनाथ 1,पांढरेवाडी 2,संख 1,दरिकोणूर 1,बिळूर 5,खोजानवाडी 1,उमराणी 1,जा.बोबलाद 3,कुणीकोणूर 2,कोळेगिरी 2,सोन्याळ 1,कुंभारी 3,प्रतापपूर 1,बेवनूर 3,कोसारी 1असे तालुक्यात 41 नवे रुग्ण आढळून आले आहेत.



Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here