संशयितावर खूनाचा गुन्हा दाखल करा | नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या ; हिवरे मारहाण प्रकरण

0



जत,संकेत टाइम्स : हिवरे ता.जत येथील आंनदा नामदेव शिंदे यांना भाविकीतील चार जणांनी जबर मारहाण केली होती,दरम्यान उपचार सुरू असताना आंनदा शिंदे यांचा मुत्यू झाला आहे.या मुत्यू प्रकरणी संशयिता विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करा,या मागणीसाठी मयत आंनदा शिंदे यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी जत पोलीस ठाणे गाठत उपोषण चालू केले होते.मात्र पोलीसांनी संशयिता‌ विरोधात ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.





याबाबत अधिक माहिती अशी,मयत आंनदा शिंदे व बिरू शिंदे,सदाशिव शिंदे यांच्यात जमिनीचा वाद आहे.ता.22 मे रोजी सदाशिव ईश्वर शिंदे व बिरू शंकर शिंदे यांनी आंनदा शिंदे यांच्या उभ्या पिकांतून जाणूनबुजून ट्रँक्टर घालून पिकांचे नुकसान केले होते.यांचा आंनदा शिंदे यांनी जाब विचारला होता.दरम्यान याचा मनात राग धरून दुपारी दोन वाजता बिरू शिंदे,सदाशिव शिंदे,राजू शिंदे,विजय शिंदे,दशरथ शिंदे,दगडू शिंदे यांनी संगनमत करून दगडू शिंदे यांच्या घरात शिरून अन्य कोण नसल्याचा फायदा घेत काठ्या,गंज,कुऱ्हाडीने गंभीर मारहाण केली होती.त्यात आंनदा शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.





तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.उपचार सुरू असताना 6 जून रोजी आंनदा शिंदे यांचा मुत्यू झाला होता.या मुत्यू प्रकरणी संशयिताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सुमारे 100 वर पुरूष,महिला,मुले अशा आंनदा शिंदे यांच्या नातेवाईकांनी मंगळवारी जत पोलीस ठाणे गाठत ठाण्याच्या आवारात ठिय्या मांडत उपोषण सुरू केले होते.संशयितांनी मारहाण केल्यामुळेच‌ आंनदा शिंदे यांचा मुत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.त्यामुळे संशयिताविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करावा,अशी पोलीसाकडे मागणी करण्यात आली. 

मारहाण करणारे संशयित गावात आता बेधडक फिरत आहेत.




Rate Card



त्यामुळे मयतांच्या नातेवाईकांनाही त्यांच्यापासून धोका आहे,असे पोलीसांना सांगण्यात आले, अखेर पोलीस अधिकाऱ्यांनी मध्यस्ती करत मृत्तदेहाचा शवविच्छेदन अवाहल आल्यानंतर तशा पध्दतीने करवाई करण्यात येईल,असे आश्वासन नातेवाईकांना दिल्यानंतर त्यांनी माघार घेतली.





हिवरे प्रकरणातील मयत आंनदा शिंदे यांच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत आंदोलन सुरू केले होते.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.