मोबाईलने बालपणातील खेळ व बालपण हिरावले

0
9

आपण म्हणतो बालपण देगा देवा!परंतु आज आपले बालपण मोबाईल हिरावून घेत आहे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. स्मार्टफोन दिवसेंदिवस छोट्या-छोट्या बालकांसाठी व युवावर्गांसाठी घातक सिद्ध होत.त्याचप्रमाणे शाळांमध्ये सुध्दा विद्यार्थीवर्ग मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे व यांचे दुष्परिणाम हळूहळू सामोरं येतांना दिसत आहे.एक वर्षांवरील मुलं रडतात म्हणून आई-वडील मुलांच्या हातात मोबाईल देवुन आपली सुटका करून घेतात.याचेही दुष्परिणाम हळूहळू समोर येतांना दिसत आहे.ही परिस्थिती फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात आपल्याला पहायला मिळते.यामुळे जगातील संपूर्ण शाळांनी मोबाईलवर बंदी आणावी असा सुचक सल्ला युनेस्कोने दिला आहे.देशासह जगात डिजिटल क्रांती झाली अवश्य परंतु त्याचा गैरवापर विद्यार्थांच्या व युवकांच्या अंगाशी येतांना दिसत आहे.सोबतच बालवयात आई-वडील मुलांना मोबाइलच्या आहारी टाकतांना दिसतात.स्मार्टफोनमुळे सामाजिक, व्यवहारीक व इतर क्षेत्रात आमूलाग्र बदल झाल्याचे आपल्याला दिसुन येते.आज मोबाईलच्या अतिवापरामुळे कोणीही कोणासोबत समक्ष बोलायला तयार नाही,घरात सर्वसाधारण चर्चा करायला तयार नाही, कोणत्याही गोष्टीची बोलण्यातून देवाणघेवाण किंवा आदानप्रदान होत नाही कारण एक वर्षांच्या मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्वच घंटो-न-घंटे मोबाईलमध्ये व्यस्त असतात. पालक आपल्या जबाबदारीपासुन पळ काढण्यासाठी व अतिलाडामुळे चिमुकले सुध्दा मोबाईलच्या आहारी गेले आहेत.यामुळे मानसिक आजार वाढण्याची दाट शक्यता आहे आणि वाढत आहे.

मोबाईलच्या गेममध्ये युवावर्ग दिवसेंदिवस फसतांना दिसत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे भारतात युवावर्ग मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आदिन झालेले आहेत. यामुळे त्यांना अनेक व्याधींचा सामना करावा लागतो आहे.शिक्षण क्षेत्रातील डिजिटल क्रांती विद्यार्थांसाठी चिंताजनक असल्याचे मत युनेस्कोच्या अहवालातून समोर आले आहे.मोबाईलचा अतिरिक्त वापर झाल्याने शैक्षणिक कामगिरी मंदावते.स्क्रीन टाईम वाढल्याने मुलांच्या भावनिक स्थिरतेवर नकारात्मक परिणाम होतो.परिणामी,मुले चिडचिडे व रागीट बनतात असेही युनेस्कोने म्हटले आहे.यामुळे मुलांमधील फिजिकल एक्टिविटी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कमी होतांना दिसत आहे हा अत्यंत चिंतेचा आणि गंभीर विषय आहे.देशात ७४ टक्के मुले (११ ते १७ वयोगटातील)  रोज ३० मिनीटेही मैदानी खेळ खेळत नाही.त्याचप्रमाणे १६ ते ३४ वयोगटातील ५९ टक्के लोक ऑनलाईन खेळ ३-३ तास खेळण्यात मग्न असतात.म्हणजेच आजची युवा पिढी मोबाईलच्या खेळांमध्ये (गेममध्ये)  मोठ्या प्रमाणात मग्न असल्याचे स्पष्ट दिसून येते.यामुळे शरीराला आवश्यकतेनुसार पाहिजे तेवढा व्यायाम मिळत नाही.डब्लुएचओच्या रिपोर्ट नुसार भारतात ११ ते १७ वयोगटातील ७४ टक्के मुले फिजीकल एक्टिव्ह नसल्याचे सांगितले जात आहे.म्हणजेच एका आठवड्यात मुलं १५० मिनिटसुध्दा खेळत नाही किंवा शारीरिक हालचाली ज्या पध्दतीने पाहिजेत त्या पध्दतीने दिसून येत नाही.यावरून स्पष्ट होते की आजचा विद्यार्थीवर्ग व युवावर्ग दिवसेंदिवस डोक्यानी कीतीही हुशार असेल परंतु शारीरिक दृष्ट्या खालावत असल्याचे दिसून येते. देशातील ४१ टक्के लोक मोबाईलच्या नादामुळे शारीरिक व्यायामाच्या दृष्टीकोनातून एक्टिव नसल्याचे दिसून येते.

म्हणजे आज बालपणापासुन तर युवा वर्गापर्यंत आणि युवावर्गापासुन तर वयस्कर लोकांना सुद्धा मोबाईलने चांगलेच जखडल्याचे आपण पहातो.यामुळे शरिराला ज्या पध्दतीने आणि ज्याप्रमाणात व्यायामाची आवश्यकता आणि गरज आहे तो मिळत नसल्याने अनेक व्याधी किंवा आजार बालकांमध्ये, युवावर्गामध्ये व अन्य लोकांमध्ये दिसून येते व यांचा परिणाम आरोग्यावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत आहे.आज भारतातच नाही तर संपूर्ण जगात मोबाईल शिवाय जिवन अधुरे असल्याचे सर्वांना वाटते. परंतु मोबाईलचा वापर दिवसेंदिवस मानवाच्या दृष्टीकोनातून घातक सिद्ध होत आहे हेही तितकेच सत्य आहे याला कोणीही नाकारू शकत नाही.म्हणजेच मोबाईलचा अती वापर जीव घेणा सीध्द होवू शकते यालाही नाकारता येत नाही.मानवाच्या मेंदूला (मस्तिष्कला) रक्तपुरवठा व्यवस्थित आणि सुरळीत झाला नाही तर (स्ट्रोक)होण्याचे मोठे कारण ठरू शकते.स्ट्रोक म्हणजे पॅरालिसीसचा ॲटॅक अथवा लकवा किंवा ब्रेन ॲटॅक असेही म्हणतात.देशात स्ट्रोकच्या आजाराचे जवळपास ६५ लाख रूग्ण असल्याचे सांगितले जाते.म्हणजेच आजच्या घडीला मोबाईलच्या अती वापरामुळे मानवजाती अत्यंत धोकादायक स्थितीत आल्याचे समजते.ही बाब स्पष्ट होते की मोबाईलच्या अती वापरामुळे लठ्ठपणा, शुगर (मधुमेह), डोळ्यांचा आजार ,मानेचा त्रास,हार्टच्या आजारासह अनेक आजार मानवाच्या शरिरात घर करीत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील अवयवांना पाहिजे त्याप्रमाणात व्यायाम मिळतच नाही.त्यामुळे ही कठीण परिस्थिती उध्दभवत आहे. मानवाला मोबाईलमुळे जेवढा आनंद मिळतो त्यापेक्षा जास्त धोका मोबाईलमुळे होणाऱ्या आजारामुळे निर्माण होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर कमीत कमी कसा करता येईल व आपल्याला शारीरिक दृष्ट्या कोणताही धोका निर्माण होणार नाही यापध्दतीने मोबाईलचा वापर व्हायला हवा.”अमेरिकन ॲकेडमी ऑफ पीडियाट्रिक्स या संस्थेने एका संशोधनात म्हटले आहे की दोन ते चार वर्षांच्या मुलांनी दिवसातून फार तर एक तास फोन वापरणे योग्य असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

चार वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांनी दररोज दोन तास मोबाईल वापरणे योग्य आहे.यापेक्षा जास्त मोबाईल वापरल्यास डोळ्यासोबतच मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो यानंतर यांचे भयंकर परिणाम भोगावे लागू शकतात.आपण काय करायचं आणि काय करू नये हे आपणच ठरवू शकतो व धोकादायक वस्तू पासून दुर राहु शकतो.आज आपण पहातो ३ ते २० वर्षे वयोगटातील मुले-मुली टीव्ही पहाताना, जेवतांना मोबाईलला चीपकुन रहातात. जनुकाय मोबाईल बीना जिवन अधुरे आहे की काय अशी परिस्थिती दिसून येते.याचा दुष्परिणाम पुढेचालुन भयानक होवू शकतो.छोटे मुलं रडायला लागले की आई-वडिल त्यांच्या हातात मोबाईल देऊन मोकळे होतात परंतु हे घातक आहे.त्यामुळे पालकांना आग्रहाची विनंती करतो की मुलांना मोबाइल पासून जितके दुर ठेवता येईल तितके दुर ठेवलेच पाहिजे. यामुळे मुलांना फिजिकल एक्टीव्हीटी किंवा व्यायाम करण्यास मदत होईल.मोबाईलचा अती वापर शरिराला घातक आहेच त्याचबरोबर त्याचा गैरवापर केला तर जीवाला सुध्दा धोका निर्माण होऊ शकतो आणि होत आहे. आजही लोक वाहन चालवितांणा मोबाईलवर बोलत रहातात यामुळे अनेक दुर्घटना झाल्याचे आपण पहातो आणि यामुळे देशात मोठ्या प्रमाणात जीवीत हाणी सुध्दा झाल्या आहेत. मोबाइल वापरायला हरकत नाही.परंतु त्याचा योग्यवेळी आणि कमीत कमी वापर व्हायला पाहिजे.अन्याथा मोबाईलमुळे जेवढे सुख आणि आनंद मिळतो.त्यापेक्षा हजार पटीने आपल्याला यातना किंवा दु:ख भोगाव्या लागतील हेही तितकेच सत्य आहे. त्यामुळे मुलांनी मोबाईल हातात घेण्यापेक्षा पुस्तक, वर्तमानपत्र हातात घेतले तर बुध्दीचा विकास झपाट्याने होईल व पुस्तकी ज्ञानामुळे शरिराच्या विकासाला मोठी चालना मिळेल. आपण एकंदरीत विचार केला तर मोबाईल युगामुळे देशातील मातीतील छोटे-छोटे खेळ नामशेष झाले किंवा होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो आहे.आजच्या युवापिढीला जुने खेळ काय होते ते सुद्धा माहिती नाही आणि या संपूर्ण गोष्टी मोबाईलमुळे उध्दभवतांना दिसते. म्हणजेच आजचे मोबाईल युग बालकांसाठी,युवा वर्गासाठी किंवा विद्यार्थांना शारिरीक दृष्ट्या अपंग करीत असल्याचे दिसून येते.यावरून असे लक्षात येते की वर्चुअल खेळांमुळे रियल खेळ हळूहळू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.आज मोबाईलची दुनिया पहाता असे वाटते “कहा गये ओ दिन”

रमेश कृष्णराव लांजेवार
(माजी विद्यापीठ प्रतिनिधी नागपूर)
मो.नं.९९२१६९०७७९, नागपूर.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here