फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सांगोला ही शाळा गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणासाठी सर्वश्रुत होताना दिसते.
कै.बिरासाहेब रुपनर यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची ज्ञानगंगा फॅबटेक पब्लिक स्कूलच्या रूपाने सांगोला सारख्या ग्रामीण भागात सुरू केली.
|| स्व्स्मै स्वल्पं
समाजात सर्वस्वम् ||
संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक पब्लिक स्कूलचे विद्यार्थी पुस्तकी शिक्षणाबरोबर आत्मविश्वासाच्या बळावर विविध शैक्षणिक प्रवाहात भविष्य घडवतात.कर्म हीच खरी पुजा निस्वार्थ भावनेने केलेली सेवा ही कोणत्याही ईश्वरपूजेपेक्षा श्रेष्ठ असते मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर हे नेहमी स्कूलच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असतात.तर त्याग,सेवा समर्पण हे एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर दिनेश रुपनर व कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय अदाटे यांच्याकडून शिकावे.संस्था सदस्यांच्या अविरत प्रयत्नातून फॅबटेक पब्लिक स्कूल अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे.
|| काक चेष्टा बकोद्यानम श्वान मुद्रा तथायेच
अल्पहारी गृहत्यागी विद्यार्थी पंचलक्षणाम ||
या संस्कृत काव्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या अंगी एकाग्रता ,चपळता, प्रामाणिकपणा, चातुर्य हे गुण शैक्षणिक प्रगती अहवालामध्ये दिसून येतात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर क्रीडा आणि कलात्मक व भावनात्मक बाजूंचा विकास करून फॅबटेक स्कूल मध्ये समग्र शिक्षण दिले जाते. उत्तम भौतिक सोयीसुविधा व शैक्षणिक गुणवत्तेने सज्ज फॅबटेक पब्लिक स्कूल आहे.शाळेच्या प्रगतीचा आढावा घेताना स्कूलमधील विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व नियोजन व सभाधिटपणा,ज्ञान,मूल्य, कौशल्ये येण्यासाठी स्कूलमधे साजरे होणारे पारंपारिक सण, उत्सव, दैनंदिन असेम्ब्ली समूह प्रार्थना स्वतः नियोजन करून सूत्रसंचालन करतात.
|| तिमिराकडून तेजाकडे ||
या संज्ञे प्रमाणे फॅबटेक स्कूलच्या उज्वल यशाच्या शिरोपेचात मानाचा तुरा म्हणजे “द इंडियाज स्कूल मेरीट अर्वाड २०२१”, “एज्युकेशन एक्सलन्स अर्वाड२०२२,” “प्रेसिडेंन्स एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड २०२३” तसेच “द इंडियाज स्कूल मेरिट अवॉर्ड नंबर वन सिटी वाईज टॉप सीबीएसई स्कूल २०२३” सलग दोन वर्ष फॅबटेक पब्लिक स्कूलला हा अवॉर्ड मिळाला.स्कूलसाठी ही गौरवाची गोष्ट आहे.
||विद्याधनं सर्वधनप्रधानम् ||
फॅबटेक स्कूल मधील विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता राखत दहावी व बारावी वर्गाची शंभर टक्के उज्वल यशाची परंपरा कायम राखत आहेत. विद्यार्थी शालाबाह्य स्पर्धेत सायन्स मेड ईजी स्पर्धेत अव्वल येतात.तर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांकाने आपल्या बुद्धीचे चातुर्य दाखवतात. इंटरनॅशनल ऑलंपियाड परीक्षेत गोल्ड मेडल मिळवून यशाची चुणूक दाखवतात.
प्राचार्य सिकंदर पाटील हे एक बहुआयामी व्यक्तिमत्वशैक्षणिक अठरा वर्षे प्रदीर्घ अनुभव असलेले प्राचार्य सिकंदर पाटील यांना सी.व्ही रमण एज्युकेशन अवॉर्ड फॉर एक्सप्लमरी लिडरशीप हा सर्वोत्तम अवॉर्ड मिळाला.मूल्यहिनपणे मूल्यहिनता: एक तौलनिक अभ्यास, (लॅप लॅम्बर्ड पब्लिकेशन, जर्मनी),सॉफ्ट स्किल्स फॉर द इंजिनिअर अशी अभ्यासपुर्ण पुस्तके त्यांच्या लेखणीतून प्रकाशित आहेत त्याशिवाय ३० संशोधन लेख सादर केले आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली फॅबटेक पब्लिक स्कूल यशोशिखरावर पोहोचली आहे.
सौ.विद्या काकासो नरूटे
एम.ए.एमएड