माजी नगरसेवक उमेश सावंत जत पोलीसांच्या ताब्यात,आज न्यायालयात हजर करणार

0
जत : माजी नगरसेवक,जत नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजय शिवाजी ताड (वय ४२, रा. ताड मळा, जत) यांच्या निघृण खूनप्रकरणी Vijay Tad murder case मागील चौदा महिन्यांपासून फरार असणारा संशयित आरोपी उमेश जयसिंगराव सावंत  (रा. जत) हा अखेर बुधवारी सांगली न्यायालयात शरण आला होता. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती.गुरुवारी जत पोलिसांनी जतचा माजी उपनगराध्यक्ष असलेल्या उमेश सावंत Umesh Sawant यास न्यायालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ताब्यात घेतले.सायंकाळी पाच वाजता त्याला जत पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

 

तासभर चौकशी केल्यानंतर त्याला वैद्यकीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. सायंकाळी सव्वासात वाजता पुन्हा जत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शुक्रवारी सावंत याला जत न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिस ठाण्यासमोर ताड व सावंतसमर्थक मोठ्या प्रमाणात जमल्याने तणावपूर्ण शांतता होती.यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.जत येथील अल्फान्सो इंग्लिश शाळेनजीक १७ मार्च २०२३ रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास माजी नगरसेवक विजय ताड हे चारचाकीतून (एमएच १० सीएन ०००२) मधून त्यांच्या मुलांना शाळेतून घरी आणण्यासाठी जात होते.

 

त्यावेळी संशयित बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण व त्याच्या साथीदारांनी दुचाकीवरून येऊन त्यांच्यावर बंदुकीतून गोळीबार करून डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताड यांच्या खूनप्रकरणी संशयित बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण (वय २७, रा. समर्थ कॉलनी, जत), निकेश ऊर्फ दाया दिनकर मदने (२४, रा. मौजे डिग्रज, ता. मिरज), आकाश सुधाकर व्हनखंडे (२४, रा. के. एम. हायस्कूलजवळ सातारा फाटा, जत), किरण विठ्ठल चव्हाण (२७, रा. आर. आर. कॉलेजजवळ जत) या चौघांना अटक केली होती.ताड यांचा खून मुख्य सूत्रधार तथा माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत याच्या चिथावणीवरून व पूर्वनियोजित कट करून केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.(Vijay Tad murder case)

 

त्यानंतर मुख्य सूत्रधार उमेश सावंत मागील १४ महिन्यापासून फरार होता. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यास २५ हजाराचे बक्षीसही जाहीर केले होते. या टोळीवर मोक्काही लावण्यात आला होता. सावंत व ताड समर्थकांची गर्दी उमेश सावंत यास जत पोलिस ठाण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच जत ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती. सावंत व ताड समर्थक मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर जमल्याने परिसरात तणावपूर्ण शांतता होती. यावेळी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
Rate Card
वैद्यकीय तपासणी करण्यात आली
विजय ताड खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या उमेश सावंत यास जत पोलिसांनी गुरुवारी सांगली येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याला जत पोलिस ठाण्यात आणण्यात आले.वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सव्वासात वाजता जत पोलिस ठाण्यात आणण्यात आले. शुक्रवारी दुपारी अटकेत असलेल्या उमेश सावंत यास जत न्यायालयासमोर Jat court
उभे करण्यात येणार आहे.
पोलिस अधीक्षकांची जत पोलिस ठाण्यास अचानक भेट
उमेश सावंत याला जत पोलिसांनी ताब्यात घेत सांगली येथून जत पोलिस ठाण्यात आणले होते. याचवेळी सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे  हेही जत पोलिस ठाण्यात आले. वैद्यकीय तपासणी करून सावंत याला पुन्हा जत पोलिस ठाण्यात आणण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर ते सांगलीकडे रवाना झाले. पोलिस अधीक्षकांची ही जत पोलिस ठाण्याला अचानक भेट दिल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.