‘महागाईचा भस्मासूर रोखा’आ.विक्रमसिंह सांवत ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे पेट्रोल पंपांवर निदर्शने

0जत,संकेत टाइम्स : पेट्रोल, डिझेल, गॅस व खाद्यतेलांच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे आज राज्यभर पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली. जत शहरातील बिजरगी पेट्रोल पंपांवर सकाळी 11 वाजता ही निदर्शने करण्यात आली.काय रे बाबा मोदी,कसला रे तुझा खेळ,मरण स्वस्त झाले,अन् महागले पेट्रोल,डिजेल असे फलक लावून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.

जत तालुका काँग्रेसच्या वतीने बिजरगी पेट्रोल पंपावर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या हातात महागाईचा भस्मासूर म्हणून नरेंद्र मोदी यांना चित्रित करण्यात आलेले फलक होते. पेट्रोल,डिझेलची दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो, केंद्र सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, आपल्या देशातील लस परदेशी पाठवणाऱ्या सरकारचा निषेध असो,अशा घोषणांनी पेट्रोल पंप परिसर दणाणून सोडण्यात आला होता.

आमदार विक्रमसिंह सांवत यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. 


पेट्रोलने शंभरी पार केली आहे. डिझेलचे दरदेखील सातत्याने वाढत आहेत. गॅसचीही दरवाढ प्रचंड प्रमाणात झाली आहे. या दरवाढीविरोधात आक्रमक झालेल्या काँग्रेसने रस्त्यावर उतरत मोदी सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. आमदार सांवत यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली.

मोदी सरकार चले जाव, मोदी सरकार म्हणजे महागाईचा भस्मासूर असे फलक हातात घेऊन कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले. लुटेरी मोदी सरकार, पेट्रोल हुआ सौ पार, पेट्रोल महंगाई से जनता बेहाल, मोदी के पूंजीपती मित्र मालामाल, पेट्रोल, डिझेल शंभर पार, मोदी बस्स करा जनतेची लूटमार अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
Rate Cardतालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार,जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, माजी सभापती बाबासाहेब कोडग,नगरसेवक भूपेंद्र कांबळे,ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माळी,महादेव कोळी आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.

आमदार विक्रमसिंह सांवत म्हणाले, पेट्रोलने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे तर डिझेलची किंमतही 90 रुपयांच्या वर गेली आहे. ही दरवाढ अशीच चालू राहिली तर डिझेल देखील शंभर रुपये होण्यास वेळ लागणार नाही.


आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात आज आम्ही राज्यभर काँग्रेसतर्फे आंदोलन करत आहोत.कोरोनामुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प झालेत. सर्वसामान्य, गरीब आणि हातावरचे पोट असणाऱ्यांना दोनवेळचे जेवण मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. अशा काळातच इंधन, गॅस दरवाढीचे संकट निर्माण झाले आहे. यामुळे मोदी सरकारने इंधन आणि गॅस दरवाढ मागे घ्यावी.

जत : इंधन दरवाढीच्या निषेधार्थ कॉंग्रेसतर्फे पेट्रोल पंपांवर निदर्शने करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.