सांगली लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीस प्रारंभ

0

 

सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघातील मतदानाच्या मतमोजणीस आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी डॉ. राजा दयानिधी, सर्वसाधारण निरीक्षक परमेश्वरम बी. मतमोजणी निरीक्षक एन. कालिदास यांच्या प्रमुख उपस्थित प्रारंभ झाला. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे, उपजिल्हाधिकारी डॉ. विकास खरात, उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे आणि सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

 

तत्पूर्वी उपस्थित उमेदवार व उमेदवारांच्या प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत स्ट्रॉंग रूम उघडण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी व निवडणूक निरीक्षक परमेश्वरम बी. मतमोजणी निरीक्षक एन. कालिदास यांनी मतमोजणी कक्ष, टपाली मतमोजणी कक्षास भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली.

 

Rate Card

मतमोजणी प्रारंभ होण्यापूर्वी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सर्वांना गोपनीयतेची शपथ दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.