जत तालुक्यात वृक्ष लागवड चळवळ बनवा | – आमदार विक्रमसिंह सावंत

0
2
जत : आ.विक्रमसिंह सावंत यांनी जत तालुक्यामध्ये वृक्ष लागवड करण्याच्या अनुषंगाने आढावा बैठक संपन्न झाली.जत तालुक्यामध्ये जमिनीचे प्रमाण जास्त व झाडांचे प्रमाण कमी असल्याने जत शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासंदर्भात विविध सामाजिक संघटना व व्यापारी असोसिएशन मेडिकल असोसिएशन तसेच संत निरंकारी युथ फॉर जत तसेच तालुक्यामधील सर्व विंड पॉवर कंपनीचे व्यवस्थापक सर्व ग्रामपंचायत व तलाठी कार्यालय यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

 

सामाजिक वनीकरण विभाग जत प्रादेशिक वनीकरण विभाग जत यांच्याकडे एकूण 1 लाख 38 हजार ३०२ झाडे उपलब्ध आहेत,ते जत तालुक्यामध्ये व शहरापासून जाणाऱ्या हायवे लगत सामाजिक संघटना व अधिकाऱ्यां मार्फत लावण्यात यावेत.याला आपण उपक्रमापेक्षा एक चळवळ म्हणून आपण यांच्याकडे बघितले पाहिजे जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळा असतो व दुष्काळी मोठ्या प्रमाणात असल्याने लोकांच्या मनामध्ये पर्यावरण विषयी जनजागृती करून महत्त्व पटवून देऊन प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याची योग्य ती निगा राखली जावी यासाठी प्रयत्न करावे.

 

विविध सामाजिक संघटनेने आपापल्या परीने झाडे लावण्याची जबाबदारी घेतली.विक्रम फाउंडेशन -2000,जत व्यापारी संघटना -500,संत निरंकारी- 500,स्वामी समर्थ-500,जागर फाउंडेशन -500,मेडिकल असोसिएशन -500,उमा चॅरिटेबल ट्रस्ट -500,पोलीस संघटना -5000,पत्रकार संघटनेमार्फत -100,जे विंड पॉवर कंपनी आहेत,त्या व्यवस्थापकाने त्यांच्याकडून जेसीबी व कुंपण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी घेतली आहे.पर्यावरणाविषयी प्रेम व आपुलकी निर्माण व्हावी व सुखी जीवन जगता यावे म्हणून वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे,असे आ.विक्रमसिंह सावंत यांनी सांगितले तसेच तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष लागवड करण्याच्या मोहिमेस गती दिली जाणार असून यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता जलद गतीने होण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे नमूद केले.
या बैठकीस उपस्थित प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, संख अप्पर तहसीलदार माघाडे साहेब,सहाय्यक गटविकास अधिकारी विठ्ठल जगताप, वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक विभाग अमोल चिरमे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक प्रवीण पाटील, गटशिक्षणाधिकारी व सर्व कृषी विभागाचे अधिकारी सर्कल तलाठी आणि जत शहरांमधील पत्रकार  विविध सामाजिक संघटनेचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here